Railway : आता पालघरहून करता येईल थेट राजस्थानची ट्रीप, रेल्वेचा मोठा निर्णय

Last Updated:

Palghar News : मुंबई सेंट्रल- भगत की कोठी साप्ताहिक विशेष गाडीला आता पालघर येथे थांबा मिळाल्याने हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

News18
News18
ठाणे : पालघर येथील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई सेंट्रल आणि राजस्थानातील भगत की कोठी यांना जोडणाऱ्या विशेष साप्ताहिक रेल्वे गाडीला आता पालघर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा दर आठवड्याला हजारो प्रवाशांना होणार असून त्यांच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे.
प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
ही विशेष गाडी एकूण आठ फेऱ्या पूर्ण करणार आहे. मुंबई सेंट्रल-भगत की कोठी गाडी दर बुधवारी रात्री 11.45 वाजता पालघरहून पुढे रवाना होईल. तर भगत की कोठी–मुंबई सेंट्रल ही गाडी दर शनिवारी पहाटे 2.20 वाजता पालघर स्थानकावरून सुटेल, त्यामुळे राजस्थान किंवा गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा थांबा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
या गाडीचा बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, साबरमती, पालनपूर, अबू आणि अबू रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरील विविध प्रमुख शहरांकडे सोयीस्करपणे प्रवास करणे शक्य होणार आहे.
या विशेष गाडीमध्ये प्रवाशांसाठी सर्व आवश्यक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रथम श्रेणी वातानुकूलित, एसी 2-टियर, एसी 3-टियर आणि एसी 3-टियर इकॉनॉमी अशा आधुनिक डब्यांचा समावेश यात आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात आरामदायी अनुभव मिळणार आहे.
advertisement
पालघरकरांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. वेळापत्रक आणि इतर माहिती पाहण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थात www.enquiry.indianrail.gov.in यावर भेट द्यावी.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Railway : आता पालघरहून करता येईल थेट राजस्थानची ट्रीप, रेल्वेचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Goa Night Club Fire: गोवा नाइट क्लब आग प्रकरण: थायलंडमध्ये लपलेल्या लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या? वाचा Inside Story
गोवा नाइट क्लब आग प्रकरण, फरार लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?
  • गोवा नाइट क्लब आग प्रकरण, फरार लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?

  • गोवा नाइट क्लब आग प्रकरण, फरार लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?

  • गोवा नाइट क्लब आग प्रकरण, फरार लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?

View All
advertisement