पाकिस्तानला कधी येणार? चाहत्याच्या प्रश्नावर आलिया भट्टचं थेट उत्तर, होतंय व्हायरल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला नुकताच एका पाकिस्तानी चाहत्याने पाकिस्तानला कधी येणार? असा प्रश्न विचारला आहे. कपूरांच्या सूनेच्या उत्तराचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
आलियाने या प्रश्नाचं उत्तर देताना परिस्थिती किती समजूतदारपणे हाताळली याबद्दल तिचं कौतुक होत आहे. आलिया सध्या खरेपणा आणि प्रामाणिकपणे वागण्यावर भर देताना दिसत आहे. आलिया म्हणाली,"प्रेक्षक नेहमी चांगल्या कामासोबत जोडले जाता. काम आवडलं तर कौतुक करतात. नाही आवडलं तर तेही सांगतात. त्यामुळे आज मी जे काही करत आहे ते खरेपणाने करत आहे".
advertisement
advertisement
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत बोलताना आलिया भट्ट म्हणाली,"करिअरच्या सुरुवातीला मला सगळं काही करुन पाहायचं होतं. त्यामुळे मी पळत होते. 17-18 वर्षांची आलिया खूप उत्साही होती. बिंदास्त होती. आताही माझ्यात उत्साह आहे पण थोडी शांत झाले आहे. यश आणि अपयश या दोन गोष्टींमुळे आपण सतर्क होतो. पण तरीही मला त्या 18 वर्षांच्या आलियाला जिवंत ठेवायचं आहे. जिला पुढे काय होणार याचा अंदाज नव्हता".
advertisement









