वणीच्या सप्तश्रृंगी गडावर टोळक्याचा राडा, नंग्या तलवारी फिरवत मंदिरात माजवली दहशत, CCTV VIDEO समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वणी येथील सप्तश्रुंगी देवीच्या गडावर एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे.
बब्बू शेंख, प्रतिनिधी वणी: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वणी येथील सप्तश्रुंगी देवीच्या गडावर एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध जगदंबा देवी मंदिर परिसरात गावगुंडाच्या एका टोळक्याने हातात तलवारी घेऊन धिंगाणा घालत दहशत माजवली आहे. ही संपूर्ण घटना मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामुळे गडाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
सप्तश्रुंगी गडावर दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक दररोज येत असतात. तलवारीसारखी शस्त्रे हातात घेऊन गुंडांनी केलेल्या या हैदोसामुळे स्थानिक नागरिकांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच सप्तश्रृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांनी तत्काळ ७ ते ८ जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरीत कारवाई केली.
advertisement
एकाची धिंड, इतरांचा शोध सुरू
या प्रकरणी वणी पोलिसांनी तातडीने कठोर भूमिका घेत सुमारे ७ ते ८ संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत टोळक्यातील एका मुख्य आरोपीला अटक केली आहे.
वणीच्या सप्तश्रृंगी गडावर हातात तलवारी घेऊ टोळक्याची दहशत pic.twitter.com/L4oT11xZEi
— News18Lokmat (@News18lokmat) December 11, 2025
advertisement
पोलिसांनी या आरोपीला धडा शिकवण्यासाठी आणि भविष्यात अशी हिंमत कोणी करू नये, यासाठी अटक केलेल्या आरोपीची सप्तश्रृंगी गडावरच धिंड काढली. गडावरील अनेक नागरिकांसमोर ही कारवाई करण्यात आली. मात्र, टोळक्यातील इतर आरोपी अजूनही फरार आहेत. वणी पोलीस फरार असलेल्या गुंडांचा कसून शोध घेत आहेत.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
December 11, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वणीच्या सप्तश्रृंगी गडावर टोळक्याचा राडा, नंग्या तलवारी फिरवत मंदिरात माजवली दहशत, CCTV VIDEO समोर









