Snapchat वर आता फ्री मिळणार नाही हे फेव्हरेट फीचर! जुने फोटो-व्हिडिओ पाहण्यासाठी द्यावे लागतील पैसे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही स्नॅपचॅट यूझर असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कंपनी आता जुने फोटो आणि व्हिडिओ साठवण्यासाठी यूझर्सकडून शुल्क आकारण्यास सुरुवात करणार आहे.
मुंबई : स्नॅपचॅट यूझर्सच्या आवडत्या फीचरपैकी एक आता फ्री राहणार नाही. कंपनीने जाहीर केले आहे की ते मेमरीज फीचर्ससाठी शुल्क आकारेल, जे जुने फोटो आणि व्हिडिओ साठवते. 2016 मध्ये लाँच झाल्यापासून, हे फीचर विनामूल्य उपलब्ध आहे आणि यूझर्सना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ साठवण्याची परवानगी देते. यूझर्स कंपनीच्या घोषणेवर नाराज आहेत आणि या निर्णयाला मागे घेण्याची मागणी करत आहेत.
तुम्हाला कधी पैसे द्यावे लागतील?
नवीन धोरणानुसार, कंपनी यूझर्सकडून 5 जीबीपेक्षा जास्त स्टोरेजसाठी शुल्क आकारेल. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे धोरण सर्व यूझर्ससाठी हळूहळू लागू केले जाईल. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की 100GB योजनेची किंमत प्रति महिना 1.99अमेरिकन डॉलर (अंदाजे ₹177) असेल, तर 250GB योजना स्नॅपचॅट+ सब्सक्रिप्शन भाग असेल ज्याची किंमत 3.99 डॉलर (अंदाजे ₹355) आहे. स्नॅपचॅटचे सध्या 90 कोटींहून अधिक मंथली अॅक्टिव्ह यूझर्स आहेत आणि कंपनी म्हणते की त्यापैकी बहुतेकांकडे 5GBपेक्षा कमी मेमरीज स्टोरेज आहे. या यूझर्सवर नवीन निर्णयाचा परिणाम होणार नाही.
advertisement
तुम्ही पैसे दिले नाहीत तर काय होईल?
5GBपेक्षा जास्त मेमरीज असलेल्या यूझर्सना एका वर्षासाठी टेंपरेरी स्टोरेज आणि त्यांचे सेव्ह केलेले कंटेंट डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. एका वर्षानंतर, त्यांना स्टोरेज प्लॅन खरेदी करावा लागेल. स्नॅपचॅट लाँच होऊन जवळजवळ एक दशक झाले आहे आणि आजपर्यंत एक ट्रिलियनपेक्षा जास्त मेमरीज सेव्ह करण्यात आल्या आहेत. आपल्या निर्णयाचे समर्थन करताना, स्नॅपचॅटने म्हटले आहे की यूझर्ससाठी हे कठीण होईल, परंतु या पैशाचा वापर या फीचर्सची व्याप्ती वाढवण्यासाठी केला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 1:07 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Snapchat वर आता फ्री मिळणार नाही हे फेव्हरेट फीचर! जुने फोटो-व्हिडिओ पाहण्यासाठी द्यावे लागतील पैसे