Weather Alert: कोकणात पावसाचा ब्रेक, ठाणे-मुंबईवर नवं संकट, हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पावसाचा जोर ओसरला असून नागरिकांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
1/5
ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पावसाच्या रिमझिम सरींनी झाली असली तरी 3 ऑक्टोबर रोजी कोकण किनारपट्टीवर हवामानाने स्थिरता दाखवली आहे. गेल्या आठवडाभर जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पाणी साचले होते आणि वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आज हवामान विभागाने कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

advertisement
2/5
मुंबईत आज सकाळपासून आकाश ढगाळ असून पाऊस नाही. दिवसभर वातावरण उकाड्याचे राहील. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. वाऱ्याचा वेग साधारण 10-12 किमी प्रतितास असेल. दमट हवामानामुळे उष्णता अधिक जाणवेल.

3/5
ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर आता कमी झालाय. सप्टेंबरभर नागरिकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला होता, पण ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसापासून सुटका मिळाली आहे. आज आकाश अंशतः ढगाळ आहे. काही भागांत सौम्य वारे सुटले असून वातावरण तुलनेने आल्हाददायक आहे. तापमान 27°C ते 30°C दरम्यान राहणार आहे. या दोन शहरांमध्ये नागरिक आरामात बाहेर पडू शकतात, कारण मुसळधार पावसाचा अडथळा नाही.

4/5
पालघर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर प्रचंड होता. अनेक ग्रामीण भागात शेतं जलमय झाली होती, तर शहरी भागात वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या मात्र परिस्थिती बदलली आहे. आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात ढगाळ वातावरण असून अधूनमधून रिमझिम सरी पडत आहेत. तर शहरी भागात दमट हवेमुळे उकाडा जाणवतोय. कमाल तापमान 30°C पर्यंत जाणार असून किमान तापमान 25°C राहील.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकोकणातील या जिल्ह्यांतही आज हवामान शांत आहे. मुसळधार पावसानंतर वातावरण हलकं झालं असून रत्नागिरी व सिंधुदुर्गात गार वाऱ्यांनी दिलासा दिलाय. रायगडमध्ये आकाश अंशतः स्वच्छ असून समुद्रकिनारी हवेत गारवा जाणवतोय. तापमान 26°C ते 30°C राहील, तर वाऱ्याचा वेग सरासरी 12-14 किमी/ता. इतका आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement