13...13...13... लोकांसाठी अनलकी, पण मराठी अभिनेत्रीसाठी ठरला सुपरलकी; कसा काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Meera Joshi : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मीरा जोशीसाठी 13 हा नंबर लकी ठरला आहे.
Meera Joshi : 13 हा नंबर अनेकांसाठी अनलकी असतो. पण हाच नंबर एका मराठी अभिनेत्रीसाठी मात्र लकी ठरलाय. अभिनेत्रीच्या आयुष्यात 13 या नंबराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मीरा जोशीने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अभिनेत्रीला म्हाडाचं घर लागलं आहे. 15 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मीराची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीची जन्मतारीख 13, फ्लॅट आणि फ्लोअर नंबर 13 आहे. त्यामुळे 13 हा नंबर अभिनेत्रीसाठी सुपरलकी आहे. यासंदर्भात खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
मीरा जोशीने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"13 हा नंबर माझ्या खूप जवळचा आहे. माझी जन्मतारीख 13. माझ्या फ्लॅट चा फ्लोअर नंतर 13 आणि फ्लॅट नंबर सुद्धा 13 च. हा निव्वळ योगायोग नाही; जणू काही युनिव्हर्स मला येथे आणण्यासाठी एकवटलं होतं असं म्हणावं लागेल. म्हाडाचे हे सगळं गणित जुळवून आणल्या बद्दल आभार. मुंबईत फ्लॅट असावा हे स्वप्न मी गेली पंधरा वर्षे उराशी बाळगून होते. कारण हीच आता माझी कर्मभूमी आहे. 15 वर्षांपूर्वी मुंबईत आले. मुंबईने आपलंसं केलं. अर्थात मुंबई सर्वांनाच आपलं करून घेते. इतकी वर्षे भाड्याच्या घरात राहिले. भाड्याच्या घरातही चांगले दिवस गेले. कोणत्याच घरमालकाने कधी खाली करा सांगितले नाही. पण स्वतःचं असं एक घर असावं असं कोणाला वाटत नाही.
advertisement
माझा स्वभाव उधळा नसल्याने माझं पंधरा वर्षांच थोडंफार सेविंग होतं".
मीराने पुढे लिहिलं आहे,"माझ्या दादाचा योग्य सल्ला आणि पै-पै अगदी योग्य ठिकाणी सेव झाली होती. पण ती रक्कम एक फ्लॅट घेण्यासाठी पुरेशी नव्हती. फ्लॅट घेण्यासाठी पालक देऊ करत असलेली मदत मी नम्रपणे नाकारली खरी पण अडचण अशी आली की या क्षेत्रा मधील लोकांना बँका लोन देत नाहीत. कारण आमचा ठोस असा इन्कम नसतो. मग बाबांनी माझं फर्स्ट नाव आणि त्यांचं सेकंड नाव असे महाराष्ट्र बँकेचे होम लोन करून दिले. फायनली माझं आज घर झालं. खरंतर हे माझे वर्ष धाडसाचं होतं. चॅलेंजिंग होतं. स्वप्नांना योग्य दिशा देणार होतं म्हटलं तरी चालेल. माझं प्रॉडक्शन हाऊस 'कृष्णसखी' मी याच वर्षी सुरु केलं आणि घर घेण्याचा योग सुद्धा याच वर्षी आला. माझ्या आईने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता स्वतःच्या अटींवर काम करण्यास प्रवृत्त करणं असो. माझ्या आईमुळेच रत्नागिरीतील एक मुलगी स्वप्नांच्या शहरात मोठी स्वप्ने पाहू शकली. अर्थात प्रत्येक प्रोफेशन मध्येच आपापल्या परीने संघर्ष असतो. तसा तो मी पण केला त्यात काही मोठे केलं असं मला वाटत नाही. माझे आई-बाबा, माझा दादा, माझा मित्र दुर्गेश, माझा गोट्या मामा, पूनम मामी आणि माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व प्रेक्षक माय बाप या सर्वांचे आभार माझ्या चढत्या आलेखासाठी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझी काळजी घेतल्याबद्दल आणि चढ-उतारांमध्ये मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. तो माझ्यासोबत सदैव असणार आहे मला त्याची खात्री आहे".
advertisement
मीरावर शुभेच्छांचा वर्षाव
मीरा जोशीच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवीन घरामध्ये सुख समृद्धी नांदो, खूप-खूप शुभेच्छा अशा कमेंट्स चाहते करत आहेत. मीरा जोशीचा 'आटली बाटली फुटली' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता तिच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
13...13...13... लोकांसाठी अनलकी, पण मराठी अभिनेत्रीसाठी ठरला सुपरलकी; कसा काय?