LPG Gas Cylinder: दसऱ्याआधी मोठा धक्का, LPG च्या दरात पुन्हा वाढ, तुम्हाला किती रुपयांना मिळणार लगेच चेक करा

Last Updated:
ऑक्टोबर 2025 मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर 16 रुपयांनी वाढवले, घरगुती सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत.
1/8
ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच खर्चात पाडणारी झाली आहे. सकाळी सकाळी LPG गॅस सिलिंडरचे दर आले. सोनं-चांदी आधीच महाग, पेट्रोलचे दर स्थिर असले तरी महागच आहेत. ऑक्टोबर 2025 ची सुरुवात सर्वसामान्यांसाठी महागाईचा मोठा झटका घेऊन आली आहे.

advertisement
2/8
महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 16 रुपयांपर्यंतची वाढ केली. ही वाढ 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये करण्यात आली असून, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक संस्थांना याचा थेट फटका बसणार आहे. आनंदाची बाब म्हणजे, 14 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

3/8
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटवर अपडेट केलेल्या दरांनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत प्रति सिलेंडर 15 रुपयांनी वाढ झाली असून, 19 किलोचा सिलेंडर आता 1580 रुपयांऐवजी 1595 रुपयांना मिळणार आहे.

4/8
मुंबई आणि चेन्नईमध्ये 16 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत या सिलेंडरची किंमत 1531 रुपयांवरून 1547 रुपये झाली आहे, तर चेन्नईत तो 1738 रुपयांऐवजी 1754 रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये 16  रुपयांची वाढ होऊन हा सिलेंडर 1700 रुपयांना उपलब्ध होईल. हे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

5/8
मागच्या तीन महिन्यांमध्ये LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र कायम ठेवण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये 51.50 रुपये, ऑगस्टमध्ये 33.50 रुपये आणि जुलैमध्ये 58 रुपयांनी हा सिलेंडर स्वस्त झाला होता.

6/8
सलग तीन महिने दर कमी झाल्यानंतर, या महिन्यात मात्र कंपन्यांनी दरवाढ करून व्यावसायिक ग्राहकांना धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि भारतीय रुपयाची स्थिती यावर हे दर अवलंबून असतात, ज्याचा आढावा दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घेतला जातो.

7/8
व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीनंतरही, स्वयंपाकघरातील दिलासा कायम आहे. 14  किलोग्रॅमच्या घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. या सिलेंडरचे दर 8 एप्रिल रोजी बदलले होते आणि त्यानंतर ते स्थिर आहेत. सध्या मुंबईत 852.50 रुपये आणि चेन्नईत 868.50 रुपयांना मिळत आहे.
[caption id="attachment_1492757" align="alignnone" width="1200"] व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीनंतरही, स्वयंपाकघरातील दिलासा कायम आहे. 14 किलोग्रॅमच्या घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. या सिलेंडरचे दर 8 एप्रिल रोजी बदलले होते आणि त्यानंतर ते स्थिर आहेत. सध्या मुंबईत 852.50 रुपये आणि चेन्नईत 868.50 रुपयांना मिळत आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
8/8
हा दरवाढीचा निर्णय प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबा आणि इतर मोठ्या व्यावसायिक संस्थांसाठी चिंतेचा विषय आहे, कारण ते मोठ्या प्रमाणावर १९ किलोच्या सिलेंडरचा वापर करतात. व्यावसायिक सिलेंडर महागल्यामुळे त्यांच्या संचालन खर्चात वाढ होणार आहे. या वाढलेल्या खर्चाचा अप्रत्यक्ष बोजा ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement