Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात हवा बदलली, सोलापूरवर नवं संकट, IMD कडून महत्त्वाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सोलापुरात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज नव्या संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
1/7
कमी दाब प्रणाली गुजरातकडे सरकून जाताच महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. आज 30 सप्टेंबर रोजी राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहिल. नांदेड वगळता राज्यात पावसाचा जोर कमीच राहील. पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात देखील मोठे बदल जाणवत असून पावसाने ब्रेक घेतला आहे. पुढील 24 तासांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
e कमी दाब प्रणाली गुजरातकडे सरकून जाताच महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. आज 30 सप्टेंबर रोजी राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहिल. नांदेड वगळता राज्यात पावसाचा जोर कमीच राहील. पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात देखील मोठे बदल जाणवत असून पावसाने ब्रेक घेतला आहे. पुढील 24 तासांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी 5.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी 26.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता आहे.

3/7
रविवारी सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 28.1अंश सेल्सिअस इतके राहीले. वादळी वाऱ्यासह 0.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्‍यता आहे.

4/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पूरस्थिती कायम आहे. मागील दोन दिवसांत कमी पाऊस पडल्याने तापमानात वाढ झाली आहे. 27 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 23.5 अंश, 28 सप्टेंबर रोजी कमाल तापमान हे 28.0 अंश तर 29 सप्टेंबर रोजी 31.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तीन दिवसांत तापमानात 7.6 अंश सेल्सिअसने वाढले. येत्या काळात पाऊस न पडल्यास तापमानात आणखी वाढ होऊ शकते. सीना आणि भीमा नदी मध्ये लाखात विसर्ग सुरू असल्याने पुराचा धोका कायम आहे.

5/7
सांगली जिल्ह्यातील बहुतांश परिसरास मागील 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 27.7 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तासगाव, कवठेमहांकाळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष बागायतदार यांची चिंता वाढवली आहे.

6/7
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी 29 सप्टेंबर रोजी 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 26 अंशावर राहिल. तसेच पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची नोंद होईल. मुख्यतः तापमानात काही अंशी वाढ होऊन अतिवृष्टीचा फटका बसलेल्या परिसरास काहीसा दिलासा मिळेल. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement