Weather Alert: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी हवापालट, कोकणात पुन्हा पाऊस की उघडीप? मुंबईचं अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रासह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज खंडेनवमीला कोकणासह मुंबईत पावसाची उघडीप राहील.
गेल्या संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने कोकण किनारपट्टीला अक्षरशः हैराण करून सोडलं होतं. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत सलग आठवडाभर पावसाचा जोर कायम होता. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, रेल्वे उशिरा धावणे अशा समस्या नागरिकांना भेडसावत होत्या. पण आता ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी हवामानात बदल जाणवतो आहे. आज पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत मागील आठवड्यात पावसाने जोर धरला होता. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पण आज मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. वातावरण ढगाळ असून हलकी रिमझिम अधूनमधून जाणवेल. तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस आणि वाऱ्याचा वेग 10-14 किमी प्रतितास इतका राहील.







