Mumbai News : बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी,गुढीपाडव्याच्या दिवशी अलर्ट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईतील बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. सायनाइड गॅसद्वारे स्फोट घडवण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे.
Mumbai News : संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे सायनाइड गॅसद्वारे स्फोट घडवण्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. या धमकीचा माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि डॉग स्क्वॉडद्वारे सखोल तपासणी करण्यात येत आहे. उद्या गुडीपाडवा सण देखील आहे,त्यामुळे या घटनेने आणखीणच खळबळ वाढली आहे. तसेच यामुळे मुंबई अलर्टवर असणार आहे.
मुंबईतील बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. सायनाइड गॅसद्वारे स्फोट घडवण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. ही धमकी मिळताच पोलिसांचा तात्काळ घटनास्थळी धाव घेतला होता.तसेच पोलिसांपाठोपाठ बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS)आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाली असून सखोल तपासणी सूरू आहे.
दरम्यान क्राईम ब्रांचची टीमही तपासात सहभागी झाली आहे. या तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि पोलिसांचा सतत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान उद्या गुढीपाडवा सण देखील या सणाच्या निमित्ताने परिसरात अलर्ट असणार आहे.
advertisement
या घटनेत नेमका धमकीचा हा ईमेल कुणी पाठवला याचा शोध घेतला जात आहे.तसेच तपास यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांना ईमेल पाठवणाऱ्याचा शोध लागतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 11:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी,गुढीपाडव्याच्या दिवशी अलर्ट









