तिसऱ्यांदा बाप बनला तरी खूश नाही स्टार क्रिकेटर, म्हणतो 'टीम बनवण्यासाठी हवे आणखी 8...'
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
तिसऱ्यांदा बाप बनल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. घरामध्ये चिमुकलीचं आगमन होताच या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्याच्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.
मुंबई : तिसऱ्यांदा बाप बनल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. घरामध्ये चिमुकलीचं आगमन होताच या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्याच्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळासोबत फोटो शेअर करून क्रिकेटपटूने घरात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ओपनर उस्मान ख्वाजाने सोशल मीडियावर तिसऱ्यांदा बाप बनल्याची पोस्ट केली आहे. या कारणामुळे ख्वाजाने क्वीन्सलँडकडून त्याचा शेवटचा फर्स्ट क्लास सामनाही सोडून दिला.
'3 पैकी 3, अमीरा माया ख्वाजा चा जन्म मागच्या शुक्रवारी झाला. आम्ही खूप आभारी आहोत, आणखी एक सुंदर मुलगी. पूर्ण टीम बनवण्यासाठी आता फक्त 8 आणखी हवेत, अल्हम्दुलिल्लाह', अशी पोस्ट उस्मान ख्वाजाने लिहिली आहे.
advertisement
ख्वाजाला आधी दोन मुली
उस्मान ख्वाजा आणि त्याची पत्नी रशेल यांना याआधीही 2 मुली झाल्या आहेत. तिसरी मुलगी झाल्यानंतर उस्मान ख्वाजाचा सहकारी डेव्हिड वॉर्नरने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनंदन मित्रा, या ओपनर आहेत वाटतं, असं वॉर्नर म्हणाला. डेव्हिड वॉर्नर यालाही 3 मुली आहेत.
ख्वाजाची निवृत्ती
उस्मान ख्वाजाने याच वर्षी ऍशेस सीरिजच्या पाचव्या टेस्ट आधी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2021-2023 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा ख्वाजा महत्त्वाचा भाग होता, ज्यात त्याने सर्वाधिक 1621 रन केले. 2023 मध्य़े ख्वाजाला आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 11:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
तिसऱ्यांदा बाप बनला तरी खूश नाही स्टार क्रिकेटर, म्हणतो 'टीम बनवण्यासाठी हवे आणखी 8...'










