advertisement

Team India : ना विराट, ना रोहित... पण बुमराहला वेगळा न्याय, एकट्यासाठी BCCI बदलणार सगळ्यात मोठा नियम!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप संपताच बीसीसीआय जसप्रीत बुमराहसाठी त्यांचा सगळ्यात मोठा नियम बदलण्याच्या तयारीत आहे.

ना विराट, ना रोहित... पण बुमराहला वेगळा न्याय, एकट्यासाठी BCCI बदलणार सगळ्यात मोठा नियम!
ना विराट, ना रोहित... पण बुमराहला वेगळा न्याय, एकट्यासाठी BCCI बदलणार सगळ्यात मोठा नियम!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता टीम इंडियाचे खेळाडू विश्रांती घेत आहेत, पण खेळाडूंना मैदानापासून फार काळ लांब राहता येणार नाही. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2026 मध्ये टीम इंडियाचे खेळाडू वेगवेगळ्या टीमकडून खेळताना दिसतील. टी-20 वर्ल्ड कप संपताच बीसीसीआय जसप्रीत बुमराहसाठी त्यांचा सगळ्यात मोठा नियम बदलण्याच्या तयारीत आहे.
बीसीसीआयने काहीच दिवसांपूर्वी 2025-2026 साठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली होती. बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक करारामध्ये ए प्लस ग्रेड काढून टाकली होती. कोणताच खेळाडू ए प्लसच्या मापदंडामध्ये बसत नसल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला होता. मागच्या वर्षीपर्यंत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हा चार खेळाडू ए प्लसमध्ये होते, ज्यांना वर्षाला 7 कोटी रुपये मिळायचे. पण रोहित आणि कोहलीने टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर जडेजाही टी-20 आंतरराष्ट्रीय मधून रिटायर झाला, त्यामुळे एकटा बुमराहच या लिस्टमध्ये शिल्लक होता.
advertisement

बुमराह-जडेजाला ग्रेड ए

बीसीसीआयने ए प्लस ग्रेडच काढून टाकल्यामुळे जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना ग्रेड ए मध्ये ठेवलं गेलं, ज्यामुळे त्यांना वर्षाला 5 कोटी रुपये मिळणार आहेत. बुमराहसारख्या सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे 2 कोटी रुपये कमी करणं चुकीचं असल्याचं बोर्डाला वाटत आहे. बीसीसीआय याबाबत विचार करत असून बुमराहला नुकसान भरपाई देण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे त्याच्यावर अन्याय होणार नाही.
advertisement

बुमराहचं नुकसान होणार नाही

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बीसीसीआय बुमराहला नुकसान भरपाई कशी द्यायची, याचा विचार करत आहे. बुमराहला 7 कोटींवरून 5 कोटींवर आणणं बोर्डाला चुकीचं वाटत आहे, त्यामुळे बीसीसीआय करारामध्ये संशोधन करू शकतं.

अक्षर पटेलच्या नावाचीही चर्चा

फक्त बुमराहच नाही तर भारताच्या टी-20 टीमचा उपकर्णधार अक्षर पटेलच्या नावाचीही चर्चा आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा अविभाज्य भाग असलेला अक्षर पटेल ग्रेड सी मध्ये आहे, त्यामुळे त्याला 1 कोटी रुपये दिले जातात. ही विसंगती दूर करण्यासाठी बीसीसीआय करारामध्ये काही बदल करू शकते, असं सांगण्यात येत आहे.
advertisement

बीसीसीआयचा 30 खेळाडूंसोबत करार

बीसीसीआयने 2025-26 साठी 30 खेळाडूंसोबत करार केला. ग्रेड ए मध्ये शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा आहेत, तर ग्रेड बी मध्ये 11 आणि उरलेले खेळाडू ग्रेड सी मध्ये आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : ना विराट, ना रोहित... पण बुमराहला वेगळा न्याय, एकट्यासाठी BCCI बदलणार सगळ्यात मोठा नियम!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement