advertisement

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी 'गुड न्यूज', आता थेट उबर ॲपवरून मिळणार मेट्रो तिकीट

Last Updated:

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पेटीएमनंतर आता उबर ॲपवर सुद्धा मुंबई मेट्रोचं तिकिट उपलब्ध होणार आहे.

News18
News18
मुंबई: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. पेटीएमनंतर आता उबर ॲपवर सुद्धा मुंबई मेट्रोचं तिकिट उपलब्ध होणार आहे. यापूर्वी मेट्रो लाईन 1 चं म्हणजे, घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील तिकिट उपलब्ध झालं होतं. आता त्यानंतर मेट्रो लाईन 2 A आणि 7 या मेट्रो लाईनचंही तिकीट आता उबर ॲपवर उपलब्ध झाले आहे. उबरने ही सुविधा आता मुंबईतही सुरू केली आहे. यापूर्वी दिल्ली आणि चेन्नईमध्येही अशी सुविधा सुरू झाली होती.
यामुळे मुंबईतील प्रवाशांना आता उबर ॲप न सोडता मेट्रोचे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खरेदी करणे सोपे होईल आणि लांब रांगा टाळता येणार आहे. उबर, मुंबई मेट्रो वन आणि ONDC Network यांच्या भागीदारीमुळे हे शक्य झाले आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट शेअर करत दिली आहे. Yatri, Ixigo, Navi, EMT, Tummoc, Tripozo, One Ticket, Autope, Magicpin, Chalo, RedBus, Highway Delite आणि Pelocal यांसारखे अनेक ॲपच्या माध्यमातून ONDC नेटवर्कच्या माध्यमातून मेट्रो तिकीट सेवा आधीपासूनच उपलब्ध आहे.
advertisement
advertisement
याशिवाय, मुंबई वन ॲप, मुंबई वन कार्ड आणि व्हॉट्स ॲप आधारित तिकिट खरेदी करून तुम्ही मेट्रो सेवांचा लाभ घेऊ शकतात. ही नवीन सुविधा सुरुवातीला प्रमुख उपनगरीय मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो लाईन 2 A आणि 7 वर उपलब्ध होत आहे. त्यानंतर लवकरच 2 B आणि 9 सोबत इतर मार्गांवरही ही सुविधा विस्तारित केली जाईल. मेट्रो तिकिट, रेल्वे तिकिट आणि कॅब बुकिंग या ॲपच्या माध्यमातून तुम्ही असे वेगवेगळे तिकिट तुम्ही बुक करू शकतात. यामुळे प्रवाशांना एकच ॲपवर सर्व बुकिंग करणं शक्य आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी 'गुड न्यूज', आता थेट उबर ॲपवरून मिळणार मेट्रो तिकीट
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement