advertisement

Pakistan : वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भुकंप,सिनिअर खेळाडूंची बोर्डाशी गद्दारी,चौकशीच्या फेऱ्यात अडकणार?

Last Updated:

पाकिस्तानच्या वर्ल्ड कप टीममधल्या बाबर आझम आणि फखर जमान या दोन खेळाडूंनी पाकिस्तान बोर्डाशीच गद्दारी केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी वर्ल्ड कप दरम्यान एक मोठी गोष्ट लपवून ठेवली होती.

pakistan
pakistan
Pakistan Cricket Board : टी20 वर्ल्ड कपआधी आणि समाप्तीनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी पाकिस्तान आहे.कारण पाकिस्तानच्या बाबतीत दररोज नवनवीन खुलासे समोर येत असतात. असे असताना आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. पाकिस्तानच्या वर्ल्ड कप टीममधल्या बाबर आझम आणि फखर जमान या दोन खेळाडूंनी पाकिस्तान बोर्डाशीच गद्दारी केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी वर्ल्ड कप दरम्यान एक मोठी गोष्ट लपवून ठेवली होती. हीच गोष्ट पाकिस्तानच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे.त्यामुळे हे खेळाडू पून्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड कप नंतर पाकिस्तान क्रिकेट टीममधून नवा वाद समोर आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मेडीकल पॅनला बाबर आझम आणि फखर जमाला सघात घेतात ते पुर्णताह फिट नव्हते असा संशय आहे. ही गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा सिनिअर सिलेक्टर आकिब जावेदने मागच्या आठवड्यात मीडियाशी बोलताना या प्रकरणी बोर्ड कारवाई करेल अशी माहिती दिली होती.
advertisement
खरं तर जानेवारी महिन्यात पाकिस्तानच्या मेडिकल पॅनेलशी जोडलेले युकेचे स्पोर्टस फिजियोथेरेपस्ट डॉ. जावेद मुगल यांनी या दोन्ही खेळाडूंची टेस्ट केली होती. या टेस्टमध्ये दोन्ही खेळाडू फिट नसल्याची माहिती समोर आली होती. पण तेव्हा ही घटना उजेडात नाही आली. पण आता जेव्हा बाबर आझमने वर्ल्ड कप समाप्तीनंतर नेशनल टी20 चॅम्पियन्सशीपमध्ये खेळण्यास नकार दिला होता. आणि हॅमस्ट्रीगचा त्रास होत असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी चौकशी केली असता बाबरला झालेली दुखापत ही खूपच गंभीर होती. आणि फखर जमान देखील अनेक महिन्यांपासून या समस्येचा सामना करत होता.
advertisement
दुखापत असताना संघात कसं घेतलं?
सुत्रानुसार, राष्ट्रीय निवड समितीने मेडीकल पॅनेलला सांगितले होतो की दोन्ही खेळाडूंना वर्ल्ड कप संघात सामील करण्यापूर्वी पाकिस्तानी टीमचे फिजियोथेरेपीस्ट क्लिफ डीकनने त्यांचा फिटनेस क्लियरन्स दिली होती. यामध्ये असाही आरोप लावला जा आहे की, क्लिफ डीकनचे खेळाडूंशी जवळचे संबंध असल्या कारणाने छोट्या मोठ्या दुखापतीला दुर्लक्ष करून त्यांना खेळण्याची परवानगी दिली होती.दरम्यान यामुळेच या दोघांची टीममध्ये एंन्ट्री झाली होती. आता बाबर आझम आणि फखर जमानची चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan : वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भुकंप,सिनिअर खेळाडूंची बोर्डाशी गद्दारी,चौकशीच्या फेऱ्यात अडकणार?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement