advertisement

Suryakumar Yadav : 'मला कॅप्टन करण्याचा निर्णय चौघांचा...', सूर्याने नावं सांगितली, रोहितचाही होता रोल!

Last Updated:

टीम इंडियाने नुकताच झालेला टी-20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकला.

'मला कॅप्टन करण्याचा निर्णय चौघांचा...', सूर्याने नावं सांगितली, रोहितचाही होता रोल!
'मला कॅप्टन करण्याचा निर्णय चौघांचा...', सूर्याने नावं सांगितली, रोहितचाही होता रोल!
मुंबई : टीम इंडिया सध्या व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहे. भारताने 2024 आणि 2026 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकला, याशिवाय 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडियाचा विजय झाला. टीम इंडियाने नुकताच झालेला टी-20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकला. 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवची भारताच्या टी-20 टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. 2026 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याला कर्णधार करण्याचा निर्णय कुणी घेतला? याचा खुलासा केला आहे.

काय म्हणाला सूर्या?

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने पीटीआयला मुलाखत दिली. 'एक वेळ अशी होती, जेव्हा तत्कालीन बीसीसीआय सचिव जय भाई यांनी मला श्रीलंका मालिकेच्या तीन-चार दिवस आधी फोन केला होता. त्यांनी फोन करून सांगितले की ते मला टी-20 टीमचा कर्णधार बनवत आहेत. त्यांनीच सर्वात आधी फोन केला होता', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
'पण मला माहीत होतं की रोहित भाई आणि अजित भाई यांनी हे आधीच ठरवून ठेवलं होतं. गौतम भाई नंतर आले. त्यांनी, राहुल सरांसोबत, जय भाईंशी यावर चर्चा केली होती. त्यानंतर, मला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आलं', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली.

टी-20 मध्ये सूर्याचं धमाकेदार रेकॉर्ड

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने 52 पैकी 42 टी-20 सामने जिंकले आहेत. सूर्याने त्याच्या कर्णधारपदाखाली एकही द्विपक्षीय टी-20 सीरिज गमावलेली नाही. सूर्यकुमार यादवने त्याच्या कर्णधारपदाखाली आणखी 8 विजय मिळवले तर तो टीम इंडियाचा सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार होईल. सूर्यकुमार यादवने भारताकडून 113 टी-20 सामने खेळले असून त्यात 3,272 रन केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : 'मला कॅप्टन करण्याचा निर्णय चौघांचा...', सूर्याने नावं सांगितली, रोहितचाही होता रोल!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement