Bank Holiday: एक दोन नाही तर ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बंद राहणार बँक

Last Updated:

ऑक्टोबर 2025 मध्ये नवरात्र, दुर्गापूजा, दिवाळी, छठपूजा, सरदार वल्लभभाई पटेल जयंतीसह 21 दिवस विविध राज्यांत बँका बंद राहणार आहेत. कामासाठी सुट्ट्यांची यादी तपासा.

बँक हॉलिडे
बँक हॉलिडे
तुम्ही तयार राहा! याचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सणवार असल्याने बरेच दिवस बँका बंद राहणार आहेत. याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार आणि प्रत्येक रविवार अशी सुट्टी असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना हा सुट्ट्यांचा महिना राहणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 21 दिवस वेगवेगळ्या राज्यांत बँक बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक महिन्यांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते.
नवरात्र आणि दुर्गापूजेनिमित्ताने, याशिवाय दसरा दिवाळीपासून ते छठपूजेपर्यंत अनेक मोठे सण एकामागोमाग येणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर 2025 हा महिना पूर्णपणे सण आणि सुट्ट्यांनी भरलेला असणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही बँकेत जाऊन काही महत्त्वाचे काम उरकायचं ठरवत असेल, तर आधीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी एकदा नक्की पाहून घ्या. कारण सणांच्या काळात बँका तब्बल अर्ध्यापेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहेत.
advertisement
ऑक्टोबरमध्ये तब्बल 21 दिवस बँका बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्टी कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिन्यात देशभरात विविध राज्यांमध्ये मिळून एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांची सुरुवात 1 ऑक्टोबरला विजयादशमीपासून होईल आणि दिवाळीनंतरच्या सणांपर्यंत ती सुरूच राहील. काही सुट्ट्या या राष्ट्रीय स्तरावरील असतील, तर काही विशिष्ट राज्यांमध्येच बँका बंद राहतील. त्यामुळे एखाद्या विशिष्ट दिवशी बँकेचे काम असल्यास त्या दिवशी सुट्टी आहे की नाही हे तपासणं आवश्यक आहे.
advertisement
1 ऑक्टोबरला विजयादशमी आणि दुर्गापूजेच्या सुट्टीने सुरुवात होईल. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशात बँका बंद असतील. 3 आणि 4 ऑक्टोबरला दशहरा आणि दुर्गापूजेच्या निमित्ताने पूर्व आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. त्यानंतर 6 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, 7 ऑक्टोबरला महर्षी वाल्मीकी जयंती, आणि 10 ऑक्टोबरला करवा चौथ यामुळेही काही ठिकाणी सुट्ट्या असतील. दुसरा शनिवार आणि रविवारी नेहमीप्रमाणे साप्ताहिक सुट्ट्या राहतील.
advertisement
20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि कालीपूजेच्या निमित्ताने काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. 21 ऑक्टोबरला मुख्य दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजा असल्याने मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या असतील. 22 आणि 23 ऑक्टोबरला बलीप्रतिपदा, विक्रम संवत नवीन वर्ष, भाईदूज आणि चित्रगुप्त जयंतीमुळेही सुट्ट्या राहतील. चौथा शनिवार आणि रविवार हे साप्ताहिक सुट्ट्या असतील. महिन्याच्या शेवटी 27 आणि 28 ऑक्टोबरला छठपूजेच्या निमित्ताने बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात बँका बंद राहतील.
advertisement
31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल जयंतीमुळे गुजरातमध्ये बँका बंद असतील. अशा प्रकारे संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात विविध सण, जयंती आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी आणि बँकेत जाण्याचं नियोजन करण्याआधी ही सुट्ट्यांची यादी नीट पाहून घ्या, जेणेकरून तुमचं महत्त्वाचं काम अडणार नाही.
मराठी बातम्या/मनी/
Bank Holiday: एक दोन नाही तर ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बंद राहणार बँक
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement