Metro 2B: मंडाळे ते चेंबूर मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला! कधीपासून प्रवाशांच्या सेवेत? समोर आली मोठी अपडेट
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Metro 2B: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीनं (एमएमआरडीए) डीएननगर ते मंडाळे मेट्रो2 ब या मार्गिकेचं काम सुरू आहे.
मुंबई: मुंबईमध्ये मेट्रोचा अतिशय वेगाने विकास करण्याचं काम सुरू आहे. ठिकठिकाणी मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीनं (एमएमआरडीए) डीएननगर ते मंडाळे मेट्रो2 ब या मार्गिकेचं काम सुरू आहे. या मार्गिकेतील चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाळे हा पहिला टप्पा लवकरच सेवेत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) या पहिल्या टप्प्यातील मार्गावर सीएमआरएस पथकाने 2 जुलै ते 4 जुलै या कालावधीत प्राथमिक तपासणी केली होती. त्यावेळी मेट्रो मार्गिकेच्या कामासंदर्भात काही सूचना देण्यात आल्या होत्या. आता कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून 3 ऑक्टोबर रोजी अंतिम तपासणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएमआरएसकडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
advertisement
डीएननगर ते मंडाळे मेट्रो 2ब मार्गिका 23.6 किलोमीटर लांबीची असून, त्यावर एकूण 19 स्टेशन्स आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे 10,986 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात पहिल्या टप्प्यात मंडाळे ते डायमंड गार्डन मेट्रो 2 ब चेंबूर या 5.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला केलं जाणार आहे.
advertisement
पहिल्या टप्प्यातली मेट्रो स्टेशन्स: मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन, चेंबूर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 9:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Metro 2B: मंडाळे ते चेंबूर मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला! कधीपासून प्रवाशांच्या सेवेत? समोर आली मोठी अपडेट