Team India : फक्त 4 खेळाडूंची जागा फिक्स, पुढच्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या 7 खेळाडूंची हकालपट्टी होणार!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 408 रननी मानहानीकारक पराभव झाला आहे. याचसोबत भारताने ही टेस्ट सीरिजही 2-0 ने गमावली आहे. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे, तसंच पुढच्या टेस्टमधून भारताच्या 6 खेळाडूंची हकालपट्टी करावी अशी मागणी चाहते करत आहेत.
1/9
टीम इंडिया पुढची टेस्ट मॅच आता थेट आठ महिन्यांनी ऑगस्ट महिन्यात खेळणार आहे. ऑगस्ट 2026 मध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळेल, तेव्हा टीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

advertisement
2/9
श्रीलंका दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या टीममधील फक्त यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या चार खेळाडूंचीच जागा फिक्स असण्याची शक्यता आहे. तर दुसरी टेस्ट मुकलेला कर्णधार शुभमन गिल कमबॅक करेल.

3/9
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर केएल राहुल हा टीमचा सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे, पण 67 टेस्ट मॅच खेळल्यानंतरही राहुलने फक्त 35.87 च्या सरासरीने रन केले आहेत, त्यामुळे राहुलचं टेस्ट टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे.

4/9
आयपीएलमधल्या धमाकेदार कामगिरीनंतर साई सुदर्शनची भारताच्या टेस्ट टीममध्ये एन्ट्री झाली, पण मिळालेल्या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. साई सुदर्शनने 6 टेस्टमध्ये 27.45 च्या सरासरीने 302 रन केले, ज्यात फक्त 2 अर्धशतकं आहेत.

5/9
ध्रुव जुरेलने 9 टेस्टमध्ये 35.31 च्या सरासरीने 459 रन केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली, पण या चारही इनिंगमध्ये जुरेल अपयशी ठरला, त्यामुळे त्यालाही टेस्टमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

6/9
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यात ऋषभ पंतने खेळलेल्या काही शॉट्सवर टीका होत आहे. टीमला सावध खेळण्याची गरज असतानाही पंतने मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, ज्यात तो आऊट झाला. असे शॉट खेळल्याबद्दल पंतची टीममधून हकालपट्टी करण्याची मागणी चाहते करत आहेत.

7/9
अश्विनच्या निवृत्तीनंतर टीमचा अनुभवी स्पिनर म्हणून जडेजाकडे बघितलं जातं, पण भारतामधल्या स्पिनरना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर जडेजाला त्याची चमक दाखवता आली नाही. जडेजाचं वय पाहता, त्यालाही पुढच्या टेस्ट मॅचमध्ये संधी मिळेल का? याबद्दल शंका आहे.

8/9
टीममध्ये जास्त ऑलराऊंडर हवे यासाठी गौतम गंभीर आग्रही असतो, त्यामुळेच नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळत आहेत. पण ऑस्ट्रेलियात शतक केल्यानंतर नितीश रेड्डीची कामगिरी निराशाजनक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये नितीश रेड्डी रिव्हर्स स्वीप मारताना आऊट झाला.

9/9
मागच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग केलेला वॉशिंग्टन सुंदर दुसऱ्या टेस्टमध्ये आठव्या क्रमांकावर खेळला. सुंदरने बॅटने समाधानकारक कामगिरी केली असली तरी त्याला टर्निंग ट्रॅकवर म्हणावं तसं यश मिळालं नाही, त्यामुळे सुंदरचं टीममधलं स्थानही धोक्यात आलं आहे.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement