6 डायरेक्टर्स, 26 स्टार, तरीही फ्लॉप ठरला सिनेमा; बॉलिवूडच्या इतिहासातील डिझास्टर फिल्म, नाना पाटेकरांनी केलेलं काम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Biggest Disaster: तब्बल अठरा वर्षांपूर्वी एक असा चित्रपट आला होता, ज्याला एक-दोन नव्हे तर सहा दिग्दर्शकांनी मिळून बनवले होते आणि त्यात तब्बल २६ मोठे स्टार्स होते. यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला.
मुंबई: बॉलिवूडमध्ये एका चित्रपटाचे दिग्दर्शन एकाच व्यक्तीने करण्याची पद्धत आहे, पण तुम्हाला माहित आहे का? तब्बल अठरा वर्षांपूर्वी एक असा चित्रपट आला होता, ज्याला एक-दोन नव्हे तर सहा दिग्दर्शकांनी मिळून बनवले होते आणि त्यात तब्बल २६ मोठे स्टार्स होते. यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला आणि एक मोठा डिझास्टर ठरला.
advertisement
advertisement
तीन तासांच्या या चित्रपटात क्राईम-थ्रिलर, वासना, धोका आणि रोमान्स अशा अनेक डार्क थीम्स पाहायला मिळाल्या. या चित्रपटात २६ हून अधिक कलाकार होते. यात संजय दत्त, सुनील शेट्टी, नाना पाटेकर, नसीरुद्दीन शाह, मनोज बाजपेयी, अरबाज खान, जिमी शेरगिल, अमृता सिंह आणि अनुपम खेर यांसारखे दिग्गज अभिनेते होते. इतकेच नाही तर दीया मिर्झा, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि शबाना आझमी यांचाही समावेश होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


