Team India : दक्षिण आफ्रिकेने घरात घुसून मारलं, आता WTC Final साठी टीम इंडियाला किती मॅच जिंकाव्या लागणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 408 रननी मोठा पराभव केला. पहिल्या डावात 201 रनवर ऑलआऊट झालेल्या भारताचा दुसऱ्या डावात 140 रनवर ऑलआऊट झाला.
गुवाहाटी : गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 408 रननी मोठा पराभव केला. पहिल्या डावात 201 रनवर ऑलआऊट झालेल्या भारताचा दुसऱ्या डावात 140 रनवर ऑलआऊट झाला. या पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये एका स्थानाचं नुकसान झालं आणि फायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्गही अडचणीत आला. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो ते जाणून घेऊया.
कोलकाता टेस्टच्या पराभवासाठी खेळपट्टीला जबाबदार धरण्यात आले, जे काही प्रमाणात योग्य होते, पण गुवाहाटीमध्ये भारतीय बॅटरची कामगिरी लाजिरवाणी होती. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 रनचा प्रचंड आकडा गाठला. सेनुरन मुथुस्वामीने शतक झळकावले, तर बॉलर असलेल्या मार्को यानसन (93) नेही भारतीय बॉलिंगविरुद्ध जलद गतीने रन केल्या. दोन्ही डावात भारतीय बॅटरनी (जयस्वाल आणि जडेजा) फक्त दोन अर्धशतके झळकावली. आता, मालिका गमावल्यानंतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा भारताचा मार्ग कठीण झाला आहे.
advertisement
गुवाहाटी कसोटीपूर्वी, 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया चौथ्या स्थानावर होती, परंतु पराभवानंतर टीम पाचव्या स्थानावर घसरली आहे. भारताने या चक्रात 9 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 जिंकले आहेत आणि 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर एक कसोटी अनिर्णित राहिली. भारताचा विजयाचा टक्का 48.15 आहे.
भारताच्या पराभवाचा फायदा पाकिस्तानला झाला आहे, जो पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानने खेळलेल्या दोन कसोटींपैकी एक जिंकला आहे आणि एक गमावला आहे.
advertisement
टीम इंडिया फायनलला पोहोचणार?
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 मध्ये भारतीय टीमचे अजूनही 9 सामने शिल्लक आहेत. भारताला नऊ पैकी आठ सामने जिंकावे लागतील, ज्यामुळे त्यांचा विजयाचा टक्का 70 च्या वर जाईल. नऊ पैकी सात कसोटी जिंकल्यानेही अंतिम फेरीत पोहोचण्याच्या टीम इंडियाच्या आशा जिवंत राहतील. पण, टीमला सामने ड्रॉ करण्याऐवजी जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
advertisement
टीम इंडियाला आता परदेशात दोन मालिका खेळायच्या आहेत. गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ज्या टीमनी प्रवेश केला त्यांचा विजयाचा टक्का 64 ते 68 इतका आहे. त्यामुळे, भारताला कोणत्याही परिस्थितीत 9 पैकी 7 कसोटी जिंकाव्या लागतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 11:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : दक्षिण आफ्रिकेने घरात घुसून मारलं, आता WTC Final साठी टीम इंडियाला किती मॅच जिंकाव्या लागणार?


