IND vs SA: गंभीर विरोधात घोषणाबाजी, कुणीच डेअरींग केली नाही, मग 'तो' मदतीला धावला,चाहत्यांची बोलती बंद, VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पराभवानंतर चाहत्यांनी 'गौतम गंभीर हाय हाय' अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणाबाजी करताना चाहत्यांना थांबवण्याची कुणीच डेअरींग केली नाही. पण तो मदतीला धावला.
India vs South Africa : साऊथ आफ्रिकेने दुसरा टेस्ट सामना 408 धावा इतक्या मोठ्या फरकाने जिंकला आहे. या विजयासह आफ्रिकेने 2-0ने भारताचा क्लीन स्वीप ही दिला आहे.विशेष म्हणजे 25 वर्षानंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेने भारतात हा कसोटी सामना जिंकला.त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा पराभव होता. या पराभवानंतर चाहत्यांनी 'गौतम गंभीर हाय हाय' अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणाबाजी करताना चाहत्यांना थांबवण्याची कुणीच डेअरींग केली नाही. पण तो मदतीला धावला.त्यामुळे गंभीरच्या मदतीला आलेला तो भारतीय खेळाडू नेमका कोण होता? हे जाणून घेऊयात.
खरं तर गौतम गभीरच्या नेतृत्वात टीम इंडियात संक्रमणातून जात आहेत.गौतम गंभीर अनेक खेळाडूंना संधी देत असल्याने आणि रणनितीत सतत बदल करत असल्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागत आहे,असा अनेकांचा आरोप आहेत.त्यामुळेच पराभवानंतर ज्यावेळेस गौतम गंभीर मैदानात आला. तेव्हा काही चाहत्यांनी 'गौतम गंभीर हाय हाय, गौतम गंभीर हाय हाय' अशा आशयाच्या घोषणा दिल्या होत्या. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला होता.
advertisement
“GAMBHIR DOWN DOWN” Chants in the Guwahati Stadium 😭
Siraj trying to silence the crowd 😐 pic.twitter.com/yeR9t0CHd5
— Prakash (@definitelynot05) November 26, 2025
दरम्यान टीम इंडियाच्या पराभवानंतर चाहत्यांना राग येणे साहजिक होते. पण गौतम गंभीर विरोधात अशा प्रकारची घोषणाबाजी करणे बरोबर नव्हते. यावेळी मैदानात सगळे खेळाडू देखीर गौतम गंभीर सोबत उभे होते.त्यामधून कुणीच चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला नाही. पण नंतर टीम इंडियाचा डीएसपी सिराज गौतम गंभीरच्या मदतीला धावला त्याने तोंडावर बोट ठेवून इशाऱ्यांमध्ये चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरी देखील चाहते शांत होत नव्हते.त्यानंतर मोहम्मद सिराजने चाहत्यांच्या आणखी जवळ जाऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत टीम इंडियाचा बॅटींग कोच सितांशु कोटकने देखील चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता.या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 11:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA: गंभीर विरोधात घोषणाबाजी, कुणीच डेअरींग केली नाही, मग 'तो' मदतीला धावला,चाहत्यांची बोलती बंद, VIDEO


