Abhishek Sharma : मॅचमध्ये जमलं नाही पण बाहेर ठोकलं! अवॉर्ड जिंकताच उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली, म्हणाला ' प्रीमियम फास्ट बॉलर...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Abhishek Sharma On Premium fast bowlers : अभिषेक शर्माने सांगितलं की, पॉवर प्लेमध्ये जर प्रतिस्पर्धी टीमने स्पिनर आणलं, तर त्यांना टार्गेट करून त्या ओव्हरचा फायदा घ्यायचा, हे त्याचे ठरलेलं होतं.
Abhishek Sharma On Shaheen Afridi : आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून टीम इंडियाने टायटल जिंकलं. फायनलमध्ये पाकिस्तानला सर्वात मोठं यश तिथं मिळालं तिथं त्यांना अभिषेक शर्माची विकेट मिळाली. अभिषेक शर्माच्या विकेटमुळे पाकिस्तानचा कॉन्डिफन्स वाढला होता. अशातच या संपूर्ण स्पर्धेत भारताचा युवा बॅटर अभिषेक शर्मा याने धमाकेदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात लवकर आऊट झाला असला तरी, त्याने स्पर्धेत दाखवलेल्या आक्रमक दृष्टिकोनाबद्दल बोलताना आपला प्लॅन स्पष्ट केला. अभिषेक शर्मा याला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
काय म्हणाला अभिषेक शर्मा?
अभिषेक शर्माने सांगितलं की, पॉवर प्लेमध्ये जर प्रतिस्पर्धी टीमने स्पिनर आणलं, तर त्यांना टार्गेट करून त्या ओव्हरचा फायदा घ्यायचा, हे त्याचे ठरलेलं होतं. तो म्हणाला, माझा प्लॅन अगदी स्पष्ट होता की, जर मला पॉवरप्लेमध्ये स्पिनर मिळाले, तर मी पॉवरप्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेन, असं अभिषेक शर्मा म्हणाला आहे. त्यावेळी अभिषेक शर्मा शाहीन शाह आफ्रिदीला टोला देखील लगावला.
advertisement
'प्रीमियम फास्ट बॉलर' आला तरी...
पॉवरप्लेचा फायदा घेताना एवढंच नाही, तर जर त्यांचा कोणताही 'प्रीमियम फास्ट बॉलर' आला, तरी मी पहिल्या बॉलपासूनच आक्रमक खेळ करेन, असं म्हणत त्याने पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीला जागा दाखवली. अभिषेक शर्माने हे वाक्य म्हणताच स्टेडियममधून एकच जल्लोष झाला. अभिषेक शर्माला देखील यानंतर हसू आवरलं नाही. अभिषेक शर्माच्या या वक्तवणातून त्याचा आत्मविश्वास आणि टी20 क्रिकेटमधील त्याचा आक्रमक दृष्टिकोन दिसून येतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : मॅचमध्ये जमलं नाही पण बाहेर ठोकलं! अवॉर्ड जिंकताच उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली, म्हणाला ' प्रीमियम फास्ट बॉलर...'