advertisement

स्वतःला तंदुरुस्त ठेवायचंय? तर जाणून घ्या कधी आणि किती पाणी प्यावं; तज्ज्ञांनी दिलाय 'हा' सल्ला!

Last Updated:
The right time to drink water : शरीरासाठी पाणी किती आवश्यक आहे, हे आपल्याला माहित आहेच. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, स्नायूंमध्ये कमकुवतपणा, थकवा आणि...
1/7
 The right time to drink water : शरीरासाठी पाणी किती आवश्यक आहे, हे आपल्याला माहित आहेच. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, स्नायूंमध्ये कमकुवतपणा, थकवा आणि विचार करण्याची क्षमता कमी होणे यासारख्या समस्या येतात. जर शरीरातील द्रवपदार्थांचे प्रमाण 10% नी कमी झाले, तर निर्जलीकरणाचा (Dehydration) धोका वाढतो. त्यामुळे, शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने ताजेपणा आणि शरीराचा समतोल राखण्यास मदत होते.

2/7
 लिंबू पाणी एक उत्कृष्ट ऊर्जा पेय (Energy Drink) आहे. दररोज सकाळी त्याचे सेवन केल्याने शरीर ताजेतवाने होते आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड रक्तातील ॲसिड निष्प्रभ करतात आणि मेटाबॉलिझम (Metabolism) वाढवतात. लिंबूतील फ्लाव्होनॉइड्स (Flavonoids) निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करतात. पाणी कधी प्यावे आणि कधी पिऊ नये, यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया...

3/7
 सकाळची सुरुवात (झाल्यावर) : दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्याने (Lukewarm Water) दिवसाची सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचन क्रिया योग्य होते. रात्रभर शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी हे सर्वात उत्तम आहे.

4/7
 जेवणापूर्वी : जेवण करण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे आधी थोडे पाणी प्यायल्यास पचन करणारे एन्झाईम्स (Digestive Enzymes) सक्रिय होतात. वैज्ञानिक पुरावे सांगतात की, जेवण करण्यापूर्वी थोडे पाणी प्यायल्यास पचन सुधारते आणि जास्त खाणे टळते.

5/7
 जेवणानंतर : सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे, जेवण झाल्यावर किमान 30 मिनिटांनी पाणी प्यावे. यामुळे पाचक रस (Digestive Juices) पातळ होत नाहीत आणि अन्न व्यवस्थित तुटते, ज्यामुळे पचन सोपे होते. जेवणानंतर अर्धा तासाने पाणी प्यायल्यास पोट फुगणे (bloating) आणि अपचन (indigestion) टाळता येते.

6/7
 तहान लागल्यावरच प्या : तुम्हाला तहान लागली असेल तेव्हा नक्कीच पाणी प्या, पण जबरदस्तीने किंवा प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिऊ नका. जास्त पाणी प्यायल्यास मूत्रपिंडावर (kidneys) दबाव येतो आणि इलेक्ट्रोलाइट्स (electrolytes) पातळ होतात, ज्यामुळे उलट थकवा येऊ शकतो.

7/7
 इतर महत्त्वाच्या वेळा : आंघोळीपूर्वी पाणी प्यायल्यास रक्त परिसंचरण (blood circulation) सुधारते आणि शरीराचे तापमान नियंत्रित होते. झोपण्यापूर्वी थोडे पाणी प्यायल्यास शरीर थंड राहण्यास मदत होते आणि निर्जलीकरण टळते. रात्री जास्त पाणी पिणे टाळा, कारण यामुळे वारंवार लघवी (frequent urination) लागू शकते आणि झोपमोड होऊ शकते.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement