Godavari Flood: गोदामाय कोपली, जालन्यात 10 हजार नागरिकांना सोडावं लागलं घर, PHOTOS

Last Updated:
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने जायकवाडीचा विसर्ग 3 लाख 6 हजार क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात आल्याने जालन्यातील तब्बल दहा हजार नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
1/5
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने जायकवाडीचा विसर्ग 3 लाख 6 हजार क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात आल्याने जालन्यातील तब्बल दहा हजार नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

advertisement
2/5
जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या एकूण 38 गावांपैकी 32 गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले, तर परतूर तालुक्यातील चार गावांचे स्थलांतर करण्यात आलं असून मंठा तालुक्यातील सात गावांना ही स्थलांतरित व्हावे लागले.

3/5
जिल्ह्यातील एकूण दहा हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यातील 6870 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा तसेच विविध समाज मंदिरात केलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांना भोजनासह विविध वैद्यकीय सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात येत आहेत.

4/5
तब्बल 23 ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील वाळकेश्वर, गंगा चिंचोली, कोठाळा, बोरी, गंधारी, शहागड आणि डोमलगाव या गावांचे स्थलांतर करण्यात आले.

5/5
घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसवाडी, शेवता, बानेगाव, मंगरूळ, पांढरे वस्ती, काळुंका माता वाडी, गुंज बुद्रुक, अंतरवाली टेंभी, शिवणगाव या गावांचे स्थलांतर झाले. तर परतूर तालुक्यातील गोळेगाव, सावंगी गंगा किनारा, चांगत पुरी आणि सावरगाव बुद्रुक या गावांचं स्थलांतर करण्यात आलं.

Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement