मित्रांशी तर खूप बोलतात पुरुष, मग बायकोशी का नाही? डॉक्टरांनी सांगितलं सायंटिफिक कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Husband wife relatonship : तुला माझ्यासोबत बोलायला काय होतं, मित्रांशी तर बरा बोलतो अशी तक्रार कित्येक महिलांची असते. पण खरंतर याचा अर्थ तो तुमच्यावर प्रेम करत नाही असं नाही किंवा त्यात त्याची काही चूकही नाही. यामागे खरंतर वैज्ञानिक कारण आहे.
नवी दिल्ली : तुम्ही पाहिलं असेल पुरुषांमध्ये मैत्रीचं नातं काही वेगळंच असतं. बायको किंवा गर्लफ्रेंड एका बाजूला आणि मित्र एका बाजूला. पुरुष मित्रांशी जितकं भरभरून बोलतात तितकं गर्लफ्रेंड किंवा बायकोशी नाही. तुला माझ्यासोबत बोलायला काय होतं, मित्रांशी तर बरा बोलतो अशी तक्रार कित्येक महिलांची असते. पण खरंतर याचा अर्थ तो तुमच्यावर प्रेम करत नाही असं नाही किंवा त्यात त्याची काही चूकही नाही. यामागे खरंतर वैज्ञानिक कारण आहे.
मित्र एकमेकांशी बराच वेळ बोलू शकतात पण बायको किंवा गर्लफ्रेंडशी नाही. यामागे वैज्ञानिक कारण आहे. पहिलं म्हणजे याला फिक्स्ड इट सिंड्रोम म्हणतात. जिथे पुरूषांना समस्यांमध्ये गुंतवून ठेवण्याची सवय असते. विशेषतः भावनिक परिस्थितीमध्ये. जिथे महिला फक्त आपले मन मोकळे करतात तेव्हा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण जर त्यांना समस्या सापडली नाही तर ते मानसिकरित्या तपासतात.
advertisement
दुसरं म्हणजे सिक्स मिनिट रूल अभ्यासात दिसून आलं आहे, भावनिक संवादात पुरुष फक्त 6 मिनिटं गुंतून राहतात नंतर त्या संवादातून बाहेर पडतात. याबाबतीत पुरुष आणि महिलांच्या मेंदूतही फरक असतो. पुरुषांचा फ्रंटल कॉर्टेक्स लॉजिकल कारण आणि समस्या सोडवण्यासाठी कारणीभूत आहे तर महिलांची लिम्बिक सिस्टम भावनिक प्रतिक्रिया आणि भावनिक संबंधांसाठी कारणीभूत आहे. त्यामुळे महिला भावनिक आणि खोल संवादात गुंतून राहतात. तर पुरुष तितकं करू शकत नाही.
advertisement
त्यामुळे संवादात तुमचा जोडीदार तुमचं नीट ऐकत नाही आहे, तुमच्याकडे दुर्लक्ष करतो असं वाटत असेल याचा अर्थ त्यांना तुमची काळजी नाही असं नाही. एकमेकांशी बोलून त्यामागील कारण समजून ही समस्या सोडवा, असा सल्ला डॉ. रोहिणी पाटील यांनी दिला आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Location :
Delhi
First Published :
September 30, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मित्रांशी तर खूप बोलतात पुरुष, मग बायकोशी का नाही? डॉक्टरांनी सांगितलं सायंटिफिक कारण