Railway Safety: रेल्वेला मिळालं 'कवच'! धडक होण्याचा धोका टळणार, कशी आहे नवीन सिस्टीम?

Last Updated:

Railway Safety: पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वेतील 730 इंजिनांमध्ये कवच बसवण्यास मान्यता मिळाली आहे.

Railway Safety: रेल्वेला मिळालं 'कवच'! धडक होण्याचा धोका टळणार, कशी आहे नवीन सिस्टीम?
Railway Safety: रेल्वेला मिळालं 'कवच'! धडक होण्याचा धोका टळणार, कशी आहे नवीन सिस्टीम?
मुंबई: गेल्या काही काळापासून रेल्वे दुर्घटनेच्या अनेक लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. अशा अपघातांमध्ये काहीवेळा जीवित आणि वित्तहानी होते. हे टाळण्यासाठी रेल्वेने उपाय शोधला आहे. रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये अत्याधुनिक 'कवच' प्रणाली सुरू होत आहे. या प्रणालीमुळे रेल्वेची समोरासमोर किंवा मागून धडक होण्याचा धोका टाळणार आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात 'कवच' प्रणालीच्या लोको चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल-रोहा मार्गावरील सोमटणे, आपटा आणि जीते रेल्वे स्टेशन्सवर लोको चाचणी यशस्वी करण्यात आली. महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी स्वदेशी 'कवच' प्रणालीच्या यशस्वी लोको चाचणीचं नेतृत्व केलं. अवघ्या 6 महिन्यांत 'कवच' कार्यान्वित करण्याबाबत मध्य रेल्वेने इतिहास रचला आहे.
advertisement
कशी आहे 'कवच' प्रणाली?
ही एक स्वदेशी 'ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन' प्रणाली आहे. रेल्वे कर्मचारी वेळेत गाडी थांबवण्यात अपयशी ठरल्यास ही प्रणाली धडक होण्यापासून वाचवू शकते. जर लोको पायलटने लाल सिग्नल असताना स्पीड कमी केला नाही, तर ही प्रणाली आपोआप ब्रेक लावते. सिग्नलची माहिती, स्पीडलिमिटचे ऑनबोर्ड डिस्प्ले, लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिट्टी वाजवणे, स्पीडलिमिटच्या ठिकाणी गाडीचा वेग नियंत्रित करणे, इत्याही कामं ही प्रणाली करू शकते.
advertisement
मार्च 2025मध्ये मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या पाच विभागांमध्ये 'कवच' उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मंजूर केली. त्यानंतर 'कवच' प्रणाली कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. संपूर्ण रेल्वे नेटवर्कसाठी सविस्तर रेडिओ आणि लिडार (Light Detection and Ranging) आधारित सर्वेक्षण करण्यात आलं. सर्व पाच विभागांमध्ये चाचणी, नेटवर्क मॉनिटरिंग आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम करण्यात आलं.
advertisement
रेल्वे बोर्डाने पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वेतील 730 इंजिनांमध्ये कवच बसवण्यास मान्यता दिली आहे. मध्य रेल्वेच्या सर्व लोको शेड्समध्ये हे काम सुरू आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेतील सुमारे 3000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'कवच' प्रणाली हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Safety: रेल्वेला मिळालं 'कवच'! धडक होण्याचा धोका टळणार, कशी आहे नवीन सिस्टीम?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement