भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरलं Philippines, काळजात धडकी भरवणारा VIDEO, 31 ठार

Last Updated:

फिलीपीन्समध्ये 6.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाने बोहोळ भागात मोठे नुकसान, 31 मृत, अनेक जखमी, St. Peter and Paul the Apostle Parish Churchही बाधित, त्सुनामीचा धोका नाही.

News18
News18
काही कळण्याच्या आतच जमीन हादरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळायला लागले. भूकंपाचे तीव्र धक्के बसले, याची तीव्रता 6.9 रिश्टर स्केलपर्यंत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर अनेक लोक जखमी आहेत. भूकंपाच्या तीव्र धक्क्याने फिलीपीन्स हादरलं आहे. मध्य फिलीपीन्समध्ये 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या एका शक्तिशाली भूकंपाने मोठे नुकसान झालं. या भूकंपात आतापर्यंत किमान 31 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी आहेत.
11 किमीवर भूकंपाचा केंद्रबिंदू
अमेरिकेच्या असोसिएटेड प्रेस (AP) या वृत्तसंस्थेनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका बोहोळ इथल्या भागाला बसला आहे. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, बोहोळ प्रांतात साधारण 33 हजार लोकवस्ती आहे. कलापेच्या पूर्व-आग्नेय दिशेला 11 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगितलं.
डोंगराळ भागात मोठं नुकसान
भूकंपाचे धक्के डोंगराळ भागातही जाणवले, एका गावात भूस्खलन आणि मोठ्या दगड कोसळल्याने अनेक घरांचं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच आपात्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जेसीबीच्या मदतीनं दगड हटवण्याचे काम सुरू आहे. बोगोमध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या जोरदार धक्क्यामुळे नागरिक घाबरून जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. भूकंपाच्या तडाख्याने किमान 22 इमारतींचे मोठे नुकसान झालं. यात एका जुन्या दगडी चर्चचाही समावेश आहे. तसेच, अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
त्सुनामीबाबत दिली मोठी अपडेट
स्थानिक भूकंपशास्त्र कार्यालयाने लेयटे, सेबू आणि बिलिरान बेटांवरील रहिवाशांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचा आणि किनाऱ्यावर न जाण्याचा इशारा दिला. समुद्राच्या पातळीमध्ये किंचित बदल होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी त्सुनामीचा धोका नाही असंही म्हटलं आहे. मात्र खबरदारीसाठी समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्सुनामीचा धोका तपासणाऱ्या पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने स्पष्ट केले आहे की, या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नाही आणि कोणत्याही प्रकारची विशेष कारवाई करण्याची आवश्यकता नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरलं Philippines, काळजात धडकी भरवणारा VIDEO, 31 ठार
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement