1 ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा! रेल्वे बुकिंग तिकिटाचे बदलणार नियम, तुमच्यावर थेट परिणाम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय रेल्वेने १ ऑक्टोबर २०२५ पासून IRCTC वर जनरल तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. PRS काउंटरवर मात्र जुने नियमच लागू राहतील.
तुमच्याकडे फक्त 12 तास शिल्लक आहे. 1 ऑक्टोबरपासून तिकिटाचे नियम बदलणार आहेत. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आता लवकरच सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर, रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे, जो १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
PRS काउंटरवर तिकीट बुकिंग पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. याचा अर्थ, ज्या प्रवाशांनी आधार कार्डाचे व्हेरिफिकेशन केलेले नाही, ते प्रवासी रेल्वे स्टेशनवरील काउंटरवर जाऊन तिकीट बुक करू शकतील. रेल्वे प्रवाशांनी IRCTC वेबसाइटवर आपले आधार कार्ड त्वरित प्रमाणित करून घ्यावे, जेणेकरून सणासुदीच्या काळात ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना गैरसोय होणार नाही.