Sarang Sathey Married : 12 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं गुपचूप केलं लग्न, PHOTO आले समोर

Last Updated:
Sarang Sathey Marriage : भाडिपा फेम अभिनेता सारंग साठ्येनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सारंगनं गुपचूप लग्न केलंय. त्याच्या लग्नाचे फोटो त्याने शेअर केलेत.
1/8
प्रसिद्ध अभिनेता आणि भाडिपाचा सर्वेसर्वा सारंग साठ्येनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सारंगने पॉलाबरोबर लग्न केलं आहे.

advertisement
2/8
सारंग आणि पॉला गेली 12 वर्ष लिव्ह इनमध्ये राहत होते. दोघांनी आम्ही लग्न करणार नाही असं ठरवलं होतं पण अचानक त्यांनी लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

3/8
सारंग आणि पॉला यांनी 28 सप्टेंबर 2025 रोजी कॅनडामध्ये लग्न केलं. सारंगने लग्नाचे काही फोटो शेअर केलेत. त्यासोबत एक खास पोस्ट देखील लिहिली आहे.

4/8
सारंगने पोस्टमध्ये लिहिलंय,
सारंगने पोस्टमध्ये लिहिलंय, "हो, आम्ही लग्न केलंय! तुम्हा सर्वांना माहीत आहे की लग्न हे आमच्यासाठी कधीच प्राधान्य नव्हतं. पण आम्हाला वेगळं करू शकेल अशी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे एक कागदाची शीट."
advertisement
5/8
 "गेलं वर्ष खूप कठीण होतं. जगभर संघर्ष सुरू होता. द्वेष इतका वाढला होता की पहिल्यांदाच आम्हाला वेगळं होण्याची भीती वाटली. पण प्रेम नेहमीच द्वेषावर विजय मिळवतं."

6/8
सारंगने पुढे लिहिलंय,
सारंगने पुढे लिहिलंय, "आमचं प्रेम आणि मैत्री जपण्यासाठी आम्ही काल म्हणजेच 28/09/2025 रोजी तो कागद घेतला. आमचं लग्न अगदी वैयक्तिक पातळीवर पार पडलं."
advertisement
7/8
 "आमचं जवळचं कुटुंब आणि काही मित्र-मैत्रिणी Deep Cove मधल्या आमच्या आवडत्या झाडाखाली जमले… आणि हा क्षण आमच्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी परफेक्ट ठरला."

8/8
 "आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि आयुष्यभर प्रियकर-प्रेयसी आणि सर्वात जवळचे मित्र राहण्याची शपथ घेतली. हीच आमची छोटीशी कहाणी! प्रेम नेहमीच जिंकणार"

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement