Pune Crime : निलेश घायवळचं लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे 'या' देशात लपलाय पुण्यातला कुख्यात गुंड

Last Updated:

Nilesh Ghaiwal in Switzerland : पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्यांचे लोकेशन लंडन आहे अशी माहिती मिळाली होती. मात्र, तो लंडनमधून नसून दुसऱ्याच देखील असल्याचं समजतंय

Nilesh Ghaiwal in Switzerland
Nilesh Ghaiwal in Switzerland
Nilesh Ghaywal location found : पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर देश सोडून पळाला आहे. घायवळने अहिल्यानगरचा खोटा पत्ता देत पळ काढला होता. त्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात जबाबदारी झटकली. पासपोर्ट विभागाने अहिल्यानगर पोलिसांनी व्हेरिफिक्शन निगेटिव्ह दिल्यानंतर ही पासपोर्ट दिल्याचा दावा केला आहे. अशातच आता निलेश घायवळचं लोकेशन पुणे पोलिसांच्या हाती लागलं आहे.

घायवळला 90 दिवसांचा व्हिसा 

पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्यांचे लोकेशन लंडन आहे अशी माहिती मिळाली होती. मात्र, तो लंडनमधून नसून दुसऱ्याच देखील असल्याचं समजतंय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश घायवळ सध्या स्विर्त्झंलंडमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला 90 दिवसांचा व्हिसा देखील मिळाला आहे. त्यामुळे आता निलेश घायवळला 90 दिवसानंतर अटक करणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement

अहिल्यानगरच्या आयुक्तालयातून पासपोर्ट

निलेश घायवळ याला अहिल्यानगरच्या आयुक्तालयातून पासपोर्ट देण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हीसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला? यावर पुणे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. पासपोर्ट कधी, केव्हा, कसा मिळवला? यावर देखील चौकशी आणि कारवाई सुरू असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
advertisement

"Not Available" रिमार्क

सराईत गुन्हेगार निलेश घायवळ याच्या पासपोर्टबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. नमूद केलेल्या पत्त्यावर कोतवाली पोलीसांनी पडताळणी केली असता संपर्क होऊ शकला नाही आणि सदर पत्त्यावर मिळून आला नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदरचे पासपोर्ट प्रकरण 16 तारखेला प्रतिकूल म्हणजेच "Not Available" रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवले होते, अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली होती.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : निलेश घायवळचं लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे 'या' देशात लपलाय पुण्यातला कुख्यात गुंड
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement