कासव आणि सशाची शर्यत झाली जुनी, आता सशाची ट्रेनसोबत रेस, जिंकलं कोण? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rabbit race with train video : सशाने चक्क ट्रेनसोबत रेस लावली हे वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. ससा आणि ट्रेनच्या शर्यतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
नवी दिल्ली : ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे. ससा आणि कासवात शर्यत लागते, कासवाच्या खूप पुढे गेल्यावर ससा मधेच थांबून झोपतो. तोपर्यंत कासव पुढे जातं. सशाला जाग येईपर्यंत कासव शर्यत जिंकतं. ही गोष्ट आता जुनी झाली. आता सशाने कासव नाही तर चक्क ट्रेनसोबत शर्यत लावली आहे.
कासवासोबतच्या शर्यतीपर्यंत ठिक होतं पण सशाने चक्क ट्रेनसोबत रेस लावली हे वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. ससा आणि ट्रेनच्या शर्यतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हिडिओमध्ये एक ससा ट्रेनशी शर्यत करताना दिसत आहे. ससा पुढे आणि ट्रेन मागे असं हे दृश्य आहे. जसा ट्रेनचा आवाज येतो तसा ससा धावतो. ट्रेनचा आवाज मोठा आला की ससा आणखी वेगाने धावतो. जणू काही ससा आणि ट्रेनची शर्यतच लागली आहे.
advertisement
या शर्यतीत कोण जिंकणार अशी उत्सुकताही लागून राहते. काही वेळाने ट्रेन सशापर्यंत पोहोचते आणि व्हिडीओचा शेवट ही येतो. व्हिडीओच्या शेवटी ट्रेन सशापर्यंत पोहोचल्याची दिसते आहे. पण त्याच्यापुढे काय हे मात्र या व्हिडीओत नाही.
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. कासवाकडून हरल्यानंतर सशाला धक्का बला होता. आज तो ट्रेनला हरवून बदला घेत आहे. ट्रेनला हरवल्यानंतरच ससा समाधानी होईल. अशी कमेंट लोकांनी केली आहे. तर काहींनी व्हिडीओची तुलना सबवे सर्फर्स गेमशीही केली आहे.
advertisement
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, ससा आणि ट्रेनची शर्यत कशी वाटली? तुमच्या मते या रेसमध्ये कोण जिंकलं? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
भारतातील ट्रेनचा स्पीड किती असतो?
भारतातील ट्रेनचा स्पीड ट्रेन कोणती आहे यावर अवलंबून आहे. सामान्यपणे ट्रेनचा सरासरी वेग 50-65 किमी प्रति तास असतो. वंदे भारत आणि अमृत भारतसारख्या सेमी हाय स्पीडचा ट्रेन ताशी 130 किमी. तर भारतातील काही ट्रेन अशाही आहेत ज्यांचा वेग 160 किमी ताशी असू शकतो.
advertisement
भारतातील वेगवेगळ्या ट्रेनचा वेग
मालगाडी : सरासरी गती खूप कमी असते. जवळपास 25 किमी प्रतितास
सामान्य प्रवासी ट्रेन : यांचा वेग सरासरी 50-65 किमी प्रति तासच्या आसपास असतो.
सुपरफास्ट आणि एक्स्प्रेस ट्रेन : या ट्रेन 100-110 किमी प्रति 100-110 किमी वेगाने चालतात.
सेमी हाय स्पीड ट्रेन : काही खास मार्गांवर ताशी 130 किमी वेगाने चालतात.
Location :
Delhi
First Published :
September 30, 2025 1:04 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कासव आणि सशाची शर्यत झाली जुनी, आता सशाची ट्रेनसोबत रेस, जिंकलं कोण? Watch Video