KISS आणि लिफ्ट! कपलचा गरबा पाहून सगळे हादरले, पोलिसात पोहोचलं प्रकरण, सोडावा लागला देश
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple garba video : सोशल मीडियावर गरब्याचे असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहत असाल. अशाच एक कपलच्या गरब्याचा व्हिडीओ. जो व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या कपलला देशच सोडावा लागला आहे.
अहमदाबाद : नवरात्रोत्सव म्हणून सगळीकडे गरबा, दांडियाची धूम आहे. मोठमोठ्या दांडिया कार्यक्रममध्ये लोक जात आहेत. गरबा खेळताना आपले व्हिडीओ पोस्ट करत आहेत. सोशल मीडियावर गरब्याचे असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहत असाल. अशाच एक कपलच्या गरब्याचा व्हिडीओ. जो व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या कपलला देशच सोडावा लागला आहे.
कितीतरी कपल आपल्या गरब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि ते व्हायरल होतात. या कपलचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण त्यांचा गरबा पाहून सगळे संतापले आहेत. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. प्रकरण इतकं वाढलं की जोडप्याला माफी मागावी लागली. नंतर देशच सोडून जावं लागलं. असं या कपलने काय केलं आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये हे कपल एकमेकांना किस करताना आणि विचित्र पोझ देताना दिसलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आणि त्यांच्यावर धार्मिक कार्यक्रमाची बदनामी केल्याचा आरोप केला. लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.परदेशातील हे कपल दोघंही
advertisement
Garba ek pavitra parampara hai 🙏
Lekin kuch couples ise badnaam kar rahe hain – dance floor par kiss, galat poses aur public mein ashobhniya harkatein 😡@GujaratPolice कृपया ऐसे मामलों पर ध्यान दें।
Garba khelne आएं, अश्लील हरकतें करने नहीं। pic.twitter.com/9o2m8d7Ar7
— Nisha Bharti (@Smiley_Nisha0) September 27, 2025
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ गुजरातमधील वडोदरातील गरबा शोचा व्हिडीओ आहे. वडोदरातील युनायटेड वे गरबा महोत्सवातील हा प्रकार आहे. 26 सप्टेंबर रोजी हे कपल इथं आलं.
कपल भारतीय वंशांचं आहे.. पण गेल्या काही वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियात राहत आहे, त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियन नागरिकत्व आहे. माफी मागितल्यानंतर एनआरआय जोडप्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. या जोडप्याचे लग्न झालं आहे, त्यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत. गरब्यातील कृत्याबाबत माफी मागितल्यानंतर या कपलला भारतच सोडावा लागला. ते ऑस्ट्रेलियाला परतले, अशी माहिती आहे.
Location :
Delhi
First Published :
September 30, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
KISS आणि लिफ्ट! कपलचा गरबा पाहून सगळे हादरले, पोलिसात पोहोचलं प्रकरण, सोडावा लागला देश