Suryakumar Yadav : ड्रेसिंग रुमध्ये 15 मिनिटात ठरला पाकिस्तानच्या बरबादीचा प्लॅन, मुंबईत येताच सूर्याचा खुलासा!

Last Updated:

Suryakumar Yadav On Pakistan Team : दुबईला गेल्यावर आम्ही ठरवलं की हँडशेक करायचा नाही. काय करायचं? यावर आम्ही चर्चा केली, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

Suryakumar Yadav On Pakistan
Suryakumar Yadav On Pakistan
India vs Pakistan : रविवारी आशिया कपचा फायनल सामना खेळवला गेला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या अन् पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर वाद आणखी पेटल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया भारतात परतली असून कॅप्टन सूर्या मुंबईत दाखल झाला. मुंबईत आल्यानंतर सूर्याने पाकिस्तानच्या बरबादीचा प्लॅन कसा आखला होता? यावर खुलासा केला आहे.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

आम्ही सर्वजण आधीच इमोशनल होतो. आम्हाला वाटलं आशिया कप होणार नाही. पण नंतर कळालं की आशिया कप होणार... दुबईला गेल्यावर आम्ही ठरवलं की हँडशेक करायचा नाही. काय करायचं? यावर आम्ही चर्चा केली. पाकिस्तानकडून काहीतरी येणार हे आम्हाला माहिती होतं. पाकिस्तानमध्ये निराशा होती. त्यावेळी आम्ही सगळे एकत्र आलो ड्रेसिंग रुममध्ये आम्ही बसलो. 15 मिनिटं आमची मिटिंग झाली, काय करायचं? यावर सर्वांनी मत मांडलं, असा खुलासा सूर्यकुमार यादवने केला आहे.
advertisement

पाकिस्तानचा संघ बावचळला होता - सूर्यकुमार यादव

त्यावेळी आम्ही ठरवलं की, आता फक्त क्रिकेटवर लक्ष देऊ. आमच्याकडे चांगली संधी होती, पाकिस्तानला हरवण्याची... आम्ही ठरवलं की, क्रिकेट चांगलं खेळूया आणि या ग्राऊंडवर पण त्यांना हरवूया, असं आमचं ठरलं होतं, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. पाकिस्तानने रडीचा डाव खेळला का? असा प्रश्न विचारल्यावर... क्रिकेटच्या मैदानात आम्ही निवांत खेळलो. पण पाकिस्तान बावचळला होता. पाकिस्तानवाले काही वेगळं वेगळं बोलत होते. ग्राऊंडवर पण पाकिस्तानचा संघ बावचळला होता, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement

घरी पोहोचताच सूर्यकुमारचे औक्षण

दरम्यान, आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादव याचे त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याच इमारतीत राहणारे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेसह सूर्याचे शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन केले. यावेळी सूर्यकुमारचे औक्षणही करण्यात आले. त्यानंतर सूर्यकुमार याने शेवाळे यांच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटो सेशन देखील केले.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : ड्रेसिंग रुमध्ये 15 मिनिटात ठरला पाकिस्तानच्या बरबादीचा प्लॅन, मुंबईत येताच सूर्याचा खुलासा!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement