महाराष्ट्र हादरला! घरी बोलवून चहा पाजला अन्..., नराधमाचा विवाहितेवर वारंवार अत्याचार, VIDEO ही काढले

Last Updated:

Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका विवाहित महिलेला गुंगीचं औषध पाजून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

News18
News18
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका विवाहित महिलेला गुंगीचं औषध पाजून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला केला आहे. हे गंभीर प्रकरण समोर येताच शहरात खळबळ उडाली आहे.
advertisement
सचिन ज्ञानेश्वर चोपडे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. त्याने ओळखीच्या विवाहित महिलेला आपल्या घरी बोलावलं. यावेळी आरोपीने तिला चहा प्यायला दिला. हा चहा पिताच पीडितेला गुंगी आली. यानंतर आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
advertisement
यावेळी आरोपीनं पीडितेचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओज काढले होते. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी मागील अनेक दिवसांपासून पीडित महिलेचं लैंगिक शोषण करत होता. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
advertisement
या संपूर्ण प्रकरणाबाब आरोपी सचिन चोपडे याच्या बहीणीला देखील सर्व माहिती होती. पण तिने आरोपी भावाला साथ दिल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी सचिन चोपडेसोबत त्याच्या बहिणीविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरण शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(m), ३५१(२), ३(५) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संदीप बारींगे करत आहेत. या धक्कादायक घटनेने शेगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
महाराष्ट्र हादरला! घरी बोलवून चहा पाजला अन्..., नराधमाचा विवाहितेवर वारंवार अत्याचार, VIDEO ही काढले
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement