Silver price new record: 200000 रुपयांवर जाणार चांदी, गुंतवणूक करावी का? एक्सपर्टने थेट सांगितलं

Last Updated:

चांदीचे दर 1 लाख 51 हजार रुपयांहून अधिक झाले असून मागणी वाढल्याने आणखी वाढण्याची शक्यता आहे. नितिन केडिया यांच्या मते इंडिस्ट्रियल डिमांडमुळे दर वाढले आहेत.

News18
News18
सध्या चांदीचे दर चांगलेच गगनाला भिडले आहे. या वर्षभरात चांदीने 67 टक्क्यांहून अधिक ग्राहकांना रिटर्न्स मिळवून दिले आहेत. सोन्याचे दर वाढत आहेत म्हणता म्हणता चांदी मात्र सोन्याच्या मागून येऊन चर्चेत आली आणि भावही खाऊन गेली. खोटं नाही 31 डिसेंबर 2024 रोजी जी चांदी 90 आणि 92 हजारांच्या आसपास होती तेच दर आता 1 लाख 51 हजार रुपयांहून अधिक प्रति किलो पोहोचले आहेत. येत्या काळात चांदीचे दर कमी होण्याचे कोणतेही संकेत नाहीत. याउलट गणपतीपासून दिवसेंदिवस चांदीचे दर कलेकलेनं वाढत चालले आहेत. चंद्राप्रमाणे चांदीचे दर वाढत आहेत.
सध्या जागतिक बाजारात आर्थिक अस्थिरतेचे वातावरण असताना, सुरक्षित गुंतवणुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, येत्या काळात मागणीचा विचार करता चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीआधीच चांदीने 1 लाख 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यापुढे सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पॅनल, इलेक्ट्रिक वाहाने यामध्ये चांदीचा वापर केला जातो. याशिवाय फेड रिझर्व्ह बँक दर कमी करण्याच्या तयारीत आहे. डॉलरवर असलेला दबाव, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तणाव आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्या चांदीमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे. इतकंच नाही तर दागिने घेण्याऐवजी लोक ETF, गोल्ड सिल्वर पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केले जात आहेत.
advertisement
सध्याची परिस्थिती पाहता सोनं आणि चांदीचे दर वाढते राहण्याची शक्यता आहे. केडिया फिनकॉर्पचे फाउंडर नितिन केडिया यांच्या म्हणण्यांनुसार इंडिस्ट्रियल डिमांडमुळे चांदीची मागणी वाढली आहे. थायलंडमध्ये खाण बंद झाल्यामुळे चांदी मिळण्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि त्याच बरोबर मागणी वाढली आहे. डिसेंबर पर्यंत चांदी 66 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतीय रुपयात विचार करायचा तर 2 लाख रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
advertisement
मागच्या पाच दिवसांमध्ये 8 टक्के चांदीमध्ये वाढ झाली आहे. दसऱ्याला नवा रेकॉर्ड नोंदवण्याची शक्यता आहे. ज्यांना चांदी घेणं शक्य आहे त्यांनी गुंतवणूक करावी मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने, याचं कारण म्हणजे आता चांदीचे दर घसरणार नाही तर आणखी वाढत जाणार त्यामुळे या भ्रमात राहू नये की कमी होतील तेव्हा बघू किंवा घेऊ, असलेले चांदी विकण्याची घाई करू नये असं आवाहन देखील केलं आहे. कोणताही घाईत घेतलेला निर्णय नुकसानकारक ठरू शकतो.
मराठी बातम्या/मनी/
Silver price new record: 200000 रुपयांवर जाणार चांदी, गुंतवणूक करावी का? एक्सपर्टने थेट सांगितलं
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement