Indian Railway Confirm Ticket : वेटिंगचं नो टेन्शन! या 15 मिनिटात बुक केलात तर तिकीट कन्फर्म
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रेल्वेने IRCTC खाते आधारशी लिंक केलेल्यांना तिकीट बुकिंगच्या पहिल्या 15 मिनिटांत प्राधान्य दिलं आहे. नवीन नियम दिवाळी छटपूजा प्रवासासाठी महत्त्वाचा ठरेल.
नवी दिल्ली: जर तुम्ही दिवाळी, छटपूजा सारख्या सणांना रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून रेल्वे तिकीट बुकिंगचा एक नवा नियम लागू झाला आहे. आतापर्यंत हा नियम केवळ तत्काल तिकीट बुकिंगसाठी लागू होता, पण आता तो जनरल आरक्षित तिकिटांसाठीही लागू करण्यात आला आहे. यामुळे ऑनलाइन तिकीट बुक करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाला या बदलाची माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर नुकसान होऊ शकतं.
रिझर्व्हेशन उघडल्यावर पहिले 15 मिनिटे महत्त्वाची
नवीन नियमानुसार, कोणत्याही ट्रेनचे रिझर्व्हेशन उघडल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत केवळ तेच लोक ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील, ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झालेले आहे. याचा अर्थ, ज्या प्रवाशांनी त्यांचे IRCTC खाते आधारशी लिंक केलेले नाही, त्यांना रिझर्व्हेशन सुरू झाल्यानंतरची पहिली 15 मिनिटे ऑनलाइन बुकिंगची परवानगी मिळणार नाही. आधार व्हेरिफाय झालेल्या खात्यांनाच बुकिंगमध्ये प्रायोरिटी दिली जाईल.
advertisement
फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
तिकीट बुकिंगमध्ये होणारी दलाली आणि फ्रॉड थांबवण्यासाठी भारतीय रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला. आधार ऑथेंटिकेशन केवळ व्हेरिफाईड युजर्सपर्यंत तिकीट पोहोचेल याची खात्री देतो. यामुळे थोक बुकिंग कमी होईल आणि गरजू प्रवाशांना रेल्वेच्या सुविधांचा योग्य लाभ मिळेल, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
advertisement
विंडो तिकीटाचं काय?
रेल्वेच्या रिझर्व्हेशनचा हा नवीन नियम IRCTC ची वेबसाइट आणि मोबाईल ॲप या दोन्हीवर लागू होणार आहे. मात्र, रेल्वेच्या तिकीट खिडकीवर जाऊन कॉम्प्युटरद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी ही प्रक्रिया किंवा वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहील. म्हणजेच, काउंटरवरून तिकीट काढणाऱ्यांसाठी आधार व्हेरिफिकेशनची सक्ती तात्काळ लागू नसेल.
advertisement
उदाहरणार्थ, जर तुम्हाला 15 नोव्हेंबरसाठी शिवगंगा एक्सप्रेसचे तिकीट बुक करायचे असेल, तर त्याची ऑनलाइन बुकिंग विंडो समजा मध्यरात्री साडेबारा नंतर उघडेल. आता, 12:30 ते 12:45 वाजेपर्यंतच्या या १५ मिनिटांमध्ये, केवळ तेच युजर्स तिकीट बुक करू शकतील ज्यांचे IRCTC अकाउंट आधार व्हेरिफाईड आहे. आधार व्हेरिफिकेशन नसलेले युजर्स या वेळेनंतरच म्हणजे 12:45नंतर बुकिंग करू शकतील. या नियमामुळे प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले IRCTC खाते त्वरित आधारशी जोडून घेणे आवश्यक झाले आहे. नाहीतर कन्फर्म तिकीट मिळणं कठीण होऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Indian Railway Confirm Ticket : वेटिंगचं नो टेन्शन! या 15 मिनिटात बुक केलात तर तिकीट कन्फर्म