6 हजार कोटी, 30 किमी रस्ता, देशातील हायटेक महामार्ग मुंबईला कनेक्ट होणार, वाचा कुठं आणि कधी?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai News: देशातील सर्वात हायटेक महामार्गा आता मुंबईला कनेक्ट करणार आहे. 6 हजार कोटींच्या निधीतून 30 किमी अंतराचा नवा मार्ग लवकरच बनवण्यात येणार आहे.
मुंबई: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना लवकर मुंबईत पोहोचता येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) खास प्लॅन तयार केला आहे. ठाण्यातील साकेत येथून थेट आमने बीच दरम्यान नवीन हायटेक मार्ग बनवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 29.3 किलोमीटरच्या या मार्गासाठी तब्बल 6 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
देशातील सर्वात हायटेक महामार्गाला मुंबईला कनेक्ट करणाऱ्या या मार्गाची निर्मिती ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) या आधारावर करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत आराखडा आणि महामार्गाच्या निर्मितीची सर्व जबाबदारी ठेकेदाराकडे असते. एमएमआरडीएने या मार्गाच्या निर्मितीसाठी टेंडर मागवले असून हा 29.3 किमीचा हा रस्ता मुंबई नाशिक महामार्ग म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वर बनवण्यात येईल.
advertisement
असा होणार फायदा
आमने ते साकेत दरम्यान हायटेक महामार्ग बनवल्याने वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गावरून उतरून वाहने कोणत्याही प्रकारच्या वाहतूककोंडीशिवाय सुसाट जाणार आहेत. ईस्टर्न फ्री वेचा विस्तार ठाण्यातील आनंदनगर पर्यंत करण्याचा प्रकल्प सुरू आहे. 29.3 किमी लांबीच्या एलिवेटेड रोडवरून उतरून वाहनचालक ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री-वेवरून थेट दक्षिण मुंबईत पोहोचू शकणार आहेत.
advertisement
वाहन चालकांना 2 पर्याय
नव्या हायटेक मार्गामुळे मुंबईहून नाशिक आणि शिर्डीला जाणाऱ्या वाहनांना देखील फायदा होणार आहे. कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय भाविकांना सुसाट जाता येईल. तसेच महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिकहून मुंबईला पोहोचण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवासी नाशिकहून जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून देखील ठाणे आणि मुंबईला येऊ शकतात.
वाहतूक कोंडीतून मुक्ती
समृद्धी महामार्ग ठाण्यातील आमने येथून सुरू होतो. तेथून मुंबईत येण्यासाठी जुन्या राष्ट्रीय महामार्गाचा वापर केला जातो. समृद्धी महामार्गावरून उतरल्यानंतर मुंबई किंवा ठाण्यात पोहोचण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. त्यामुळे 29 किमीचं अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ जातो. आता नव्या महामार्गामुळे या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 9:50 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
6 हजार कोटी, 30 किमी रस्ता, देशातील हायटेक महामार्ग मुंबईला कनेक्ट होणार, वाचा कुठं आणि कधी?