Beed: बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, इनोव्हा फोडली, घटनास्थळाचा VIDEO
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड : राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. पण, अशातच बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात राम खाडे हे थोडक्यात बचावले आहे.
बीडमधील अहिल्या नगर - बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर हा हल्ला झाला आहे. दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. यात राम खाडे हे गंभीर जखमी असून अहिल्यानगरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
हल्लेखुरांनी राम खाडे यांची गाडी पूर्ण फोडून टाकली आहे. राम खाडे यांच्यासोबत तीन ते चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र,हा हल्ला कुणी केला या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
advertisement
राम खाडेंनी स्वरक्षणासाठी केला गोळीबार
राम खाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून उपचार सुरू आहे. घटनास्थळावर हल्ला झाला त्या ठिकाणी राम खाडे यांच्याकडून गोळीबारही करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. राम खाडे यांच्याकडे स्व संरक्षणासाठी परवानाधारक शस्त्र आहे. या शस्त्रातून त्यांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे.
भाजप नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले म्हणून हल्ला - शेख
दरम्यान, या हल्ल्याबद्दल राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी एक फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली. बीडचे नामांकित सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांच्यावर काही वेळापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील मंदाली गावातील एका हॉटेलजवळ अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. रामभाऊ खाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे पर्दाफाश करत आहेत. त्यामुळे घोटाळे उघड करणाऱ्या व्यक्तीवर हा हल्ला ठरवूनच करण्यात आला असावा, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांना पोलीस सुरक्षा दिली होती, मात्र गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली, हे अत्यंत धक्कादायक आहे.
advertisement
तसंच, खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या बंदुकीचे रिन्यूअलही मुद्दामहून थांबवण्यात आले, हेही उघडपणे दडपशाहीचे संकेत देणारे आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे राज्यातील गृहमंत्री पूर्णपणे निष्क्रिय आहेत.
ज्यांनी समाजातील अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला, अशा लोकांच्या जीवावर हल्ले होत आहेत आणि सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. असे हल्ले होत असताना सामान्य लोकांनी मग जगायचे कसे? प्रशासन मूकबधिर झाले तर न्याय कुठून मिळणार आणि लोकांचा जीव कोणाच्या भरोशावर? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.
Location :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
Nov 26, 2025 11:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, इनोव्हा फोडली, घटनास्थळाचा VIDEO







