VijayaDashami 2025: साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा! कोणती नवी कामे-व्यवसाय सुरू करावेत? भाग्याची साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
VijayaDashami 2025: दसऱ्याचा दिवस हिंदू धर्मात अतिशय खास मानला जातो. दसरा (विजयादशमी) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे कोणतीही नवी गोष्ट सुरू करण्यासाठी तो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी पंचांग न पाहताही शुभ कार्ये करता येतात, कारण हा दिवस स्वतःच एक सिद्ध मुहूर्त आहे. दसरा हा अशुभ शक्तींवर शुभ शक्तीच्या विजयाचे प्रतीक असल्याने, या दिवसापासून नवीन कामे सुरू केल्यास त्यात यश आणि समृद्धी, मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे.
दसऱ्याला कोणती नवी कामे आणि व्यवसाय सुरू करावे?नवीन व्यवसाय किंवा उद्योगाची सुरुवात - तुमचा कोणताही नवीन व्यवसाय, दुकान किंवा स्टार्टअप असेल तर त्याचे उद्घाटन किंवा औपचारिक सुरुवात दसऱ्याच्या दिवशी करणे खूप शुभ मानले जाते. नवीन प्रकल्प किंवा मोठ्या कामाची सुरुवात (भूमिपूजन, नवीन करार इ.) या दिवशी केल्यास तो यशस्वी होतो, असे मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रवासाला सुरुवात - पूर्वीच्या काळी राजे आणि सरदार दिग्विजयासाठी (विजयासाठी प्रवास) दसऱ्यालाच बाहेर पडत असत. त्यामुळे नवीन आणि महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठीही हा शुभ मुहूर्त आहे. दसरा हा 'विजयाचा दिवस' असल्याने या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर असेल तर त्यात निश्चितच यश मिळते. शमीच्या झाडाची पूजा करणे, अपराजिता देवीचे पूजन करणे आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेणे या दिवशी विशेष महत्त्वाचे आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)