चालून वजन कमी करायचंय? लठ्ठपणा घालवण्यासाठी तुमचा 'हा' वेग असायलाच हवा, कॅलरी बर्नचं गणित वाचा!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Weight loss tips : जास्त वजन किंवा लठ्ठपणा (Obesity) ही आजकाल अनेक लोकांसाठी एक मोठी चिंता आहे. यामुळे केवळ सौंदर्यच नाही, तर अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच लोक...
Weight loss tips : जास्त वजन किंवा लठ्ठपणा (Obesity) ही आजकाल अनेक लोकांसाठी एक मोठी चिंता आहे. यामुळे केवळ सौंदर्यच नाही, तर अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच लोक वजन कमी करण्यासाठी औषधे घेणे किंवा सकाळ-संध्याकाळ चालणे (Walking) यांसारखे विविध उपाय करतात. जर तुम्हीही चालून कॅलरीज बर्न करण्याचा विचार करत असाल, तर कॅलरीज जलद बर्न करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला किती वेगाने चालावे लागेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कॅलरी बर्नसाठी चालण्याची योग्य गती
चालल्याने केवळ वजन कमी होण्यास मदत होते असे नाही, तर तुमचे स्नायू (muscles) वाढतात, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि ताण (stress) कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या चालण्याची गती अशी असावी...
- सामान्य चालणे (Normal Walking) : यामध्ये तुमचा वेग 3 ते 4 किमी प्रति तास असावा. यामध्ये कॅलरीज खूप कमी बर्न होतात.
- जलद चालणे (Brisk Walking) : वजन कमी करण्यासाठी तुमचा वेग 5 ते 6 किमी प्रति तास असावा, जो खूप चांगला मानला जातो.
- पॉवर वॉकिंग (Power Walking) : यामध्ये तुमचा वेग 6 ते 7 किमी प्रति तास असावा, जो जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी योग्य मानला जातो.
advertisement
वजन आणि कॅलरी बर्नचे सोपे गणित
तुमच्या वजनानुसार आणि चालण्याच्या वेगावर कॅलरी बर्नचे प्रमाण अवलंबून असते. अंदाजे, तुम्ही 5 किमी प्रति तास वेगाने चालत असाल तर...
- तुमचे वजन 60 किलो असेल, तर तुम्ही 200 ते 220 कॅलरीज बर्न कराल.
- तुमचे वजन 70 किलो असेल, तर तुम्ही 250 ते 260 कॅलरीज बर्न कराल.
- तुमचे वजन 80 किलो असेल, तर तुम्ही 300 ते 320 कॅलरीज बर्न कराल.
advertisement
1 किलो वजन कमी करण्यासाठी किती चालावे?
सोप्या भाषेत सांगायचे तर, 1 किलो चरबी (fat) कमी करण्यासाठी तुम्हाला 7700 कॅलरीज बर्न कराव्या लागतात. जर तुम्ही रोज चालून 250 ते 300 कॅलरीज बर्न करत असाल, तर तुमचे 1 किलो वजन अंदाजे 20 ते 25 दिवसांत कमी होऊ शकते. मात्र, हे पूर्णपणे तुमच्या आहारावर अवलंबून असेल. आहार नियंत्रित नसेल तर चालण्याचा फारसा फायदा होणार नाही.
advertisement
जलद चालण्याचे इतर फायदे
जलद चालल्याने केवळ कॅलरीजच बर्न होत नाहीत, तर तुमचे चयापचय (Metabolism) सक्रिय राहते, ज्यामुळे चरबी कमी होण्याची प्रक्रिया जलद होते. हे तुमच्या हृदय आणि फुफ्फुसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तुम्ही रोज 30 ते 60 मिनिटे जलद चालण्याचे लक्ष्य ठेवू शकता.
हे ही वाचा : Cancer : पुरुषांमध्ये सततची कंबरदुखी असू शकते गंभीर धोक्याचं कारण, होऊ शकतो 'हा' कॅन्सर
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 8:22 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
चालून वजन कमी करायचंय? लठ्ठपणा घालवण्यासाठी तुमचा 'हा' वेग असायलाच हवा, कॅलरी बर्नचं गणित वाचा!