advertisement

कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, पोलिसांच्या फोनमुळे तब्येत बिघडल्याचा आरोप

Last Updated:

कल्याण पूर्वमध्ये बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावताना रमेश तिखे देखील उपस्थित होते.

News18
News18
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावताना रमेश तिखे देखील उपस्थित होते. कोळसेवाडी पोलिसांकडून वारंवार फोन येत असल्याने रमेश तिखे यांची तब्येत खालावली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या दबावामुळे रमेश तिखे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरबाजीच्या प्रकरणात रमेश तिखे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे. या तक्रारीनंतर पोलिसांकडून तिखे यांना वारंवार पोलिस ठाण्यात बोलावण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर काल घडलेल्या घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप

ठाकरे गटाने आरोप केला आहे की, पोलिसांनी टाकलेल्या मानसिक दबावामुळेच रमेश तिखे यांचा मृत्यू झाला. पोस्टर प्रकरणात पोलिसांनी अनावश्यकपणे टिके यांना वारंवार बोलावून त्रास दिला. यामुळेच ते मानसिक तणावात होते आणि यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचागंभीर आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement

कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

दरम्यान, या प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. रमेश तिखे हे पक्षात सक्रिय आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक मृत्यूने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर शहरात चिटकवले होते. याप्रकरणी मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस या तक्रारीनंतर ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशीसाठी येण्याकरता दबाव टाकत होते. या दबावामुळेच ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांची तब्येत बिघडली कधी झाला त्यांचा आणि त्यांचा आज पहाटे हृदयविकाराने मृत्यू झाला.
advertisement

प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

पोलिसांनी मात्र आरोप फेटाळून लावत सांगितले आहे की, प्रकरणाची चौकशी कायद्याच्या चौकटीतच करण्यात आली होती. सध्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास प्रक्रिया सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, पोलिसांच्या फोनमुळे तब्येत बिघडल्याचा आरोप
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement