'सस्पेंड केलं तरी माफी मागणार नाही', महिला पोलिसाने गिरीश महाजनांना विचारला जाब, काय घडलं? पाहा VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला आहे. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: आज संपूर्ण भारतात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातोय. सकाळी अनेक मंत्री, पालकमंत्री यांनी विविध ठिकाणी ध्वजारोहन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. दरम्यान, नाशिकमधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. इथं पालकमंत्री गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला आहे. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला आहे.
पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असा पवित्रा संबंधित महिला पोलिसानं घेतला होता. माधवी जाधव असं गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला पोलिसाचं नाव असून त्या वन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी महाजनांना जाब विचारताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
माधवी जाधव नक्की काय म्हणाल्या?
advertisement
वादावादी झाल्यानंतर आपली भूमिका मांडताना माधवी जाधव म्हणाल्या की, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते. मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत."
advertisement
नाशिकमध्ये महिला पोलिसानं गिरीश महाजनांना विचारला जाव, थेट नोकरी सोडण्याची दाखवली तयारी pic.twitter.com/knTrfhd1y7
— News18 Marathi (@News18_marathi) January 26, 2026
"बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही," असा सवालही त्यांनी विचारला.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 10:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सस्पेंड केलं तरी माफी मागणार नाही', महिला पोलिसाने गिरीश महाजनांना विचारला जाब, काय घडलं? पाहा VIDEO









