Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'च्या यादीतून तुमचं नाव कट होणार? सरकारने आणला नवा नियम
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ladki Bahin Yojana New Rule: लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी निधी देताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारला भरघोस मतं मिळवून देणारी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी निधी देताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे महायुती सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
advertisement
या योजनेमुळे तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडत असल्याने बोगस लाभार्थ्यांना शोधून काढण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे. तर, दुसरीकडे विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनादेखील योजनेतून वगळण्यात आले आहे. या योजनेसाठीचे निकष कठोरपणे लागू करून आणखी काही लाभार्थ्यांना योजनेतून बाद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
निवडणुकीदरम्यान मतांच्या बेगमीसाठी योजनेच्या निकषांकडे सरकारने डोळेझाक केली होती. मात्र, आता तिजोरीवरील भार वाढू लागल्याने सरकारने निकषांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून लाखो अपात्र लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
सरकारकडून नवा नियम...
या योजनेचा लाभ गरजू महिलांना मिळावा यासाठी सरकारने नुकताच आणखी एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांचीही ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
advertisement
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीसोबतच त्या महिलेच्या पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न किती आहे, याची पडताळणी केली जाणार आहे. अविवाहित महिला लाभार्थीच्या वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार आहे. लाभार्थी महिला विवाहित असेल तर तिच्या पतीचे उत्पन्न तपासले जाणार आहे.
advertisement
लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल. लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावा, अशी मुख्य अट आहे.
पूर्वी फक्त लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासले जात होते. अनेक गृहिणी व महिलांचे उत्पन्न शून्य किंवा कमी असल्याने त्या पात्र ठरत होत्या. पण आता पती वा वडिलांचे उत्पन्न गाळणीतून जाईल, त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.
advertisement
>> घरबसल्या करा ई-केवायसी....
सर्वात आधी लाभार्थ्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. मुखपृष्ठावर उपलब्ध e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर ई-केवायसी फॉर्म उघडेल.
फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा.
advertisement
त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून Send OTP बटणावर क्लिक करावे.
या प्रक्रियेनंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
ओटीपी फॉर्ममध्ये भरून Submit बटणावर क्लिक केल्यास प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
जर आधीच पूर्ण असेल तर स्क्रीनवर ''ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे'' असा मेसेज दिसेल.
जर आधार क्रमांक पात्र यादीत नोंदलेला असेल, तर पुढील टप्प्यावर जाता येईल.
या टप्प्यात लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड नमूद करून संमती दर्शवावी आणि Send OTP बटणावर क्लिक करावे.
मोबाईलवर आलेला ओटीपी भरून Submit क्लिक करावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'च्या यादीतून तुमचं नाव कट होणार? सरकारने आणला नवा नियम