advertisement

Aishwarya Narkar : व्ह्यूज वाढवण्यासाठी असे कपडे घालता! ट्रोलर्सची कमेंट, ऐश्वर्या नारकारांचा चढला पारा; अशी केली बोलती बंद

Last Updated:

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी योगसाधनेचा व्हिडिओ शेअर केल्यावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्यांनी ट्रोलरला सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.

News18
News18
लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनयासोबतच त्या सोशल मीडियावरही बऱ्याचदा चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्या आणि त्यांचे पती नारकर यांच्याबरोबर त्यांचे रील व्हिडीओ नेहमीच चर्चेत येतात. दोघांची एव्हरग्रीन जोडी सोशल मीडियावर खूप हिट ठरली आहे. मात्र कधी कधी या व्हिडिओंमुळे त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. दोघेही फिटनेस फ्रिक आहेत. त्यांच्या व्यायामाचे व्हिडीओही ते शेअर करत असतात.
अलीकडेच ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या योगसाधनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. फिटनेस आणि नियमित व्यायामाचा संदेश देण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. पण या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.
advertisement
या व्हिडिओवर एका युझरने कमेंट करत लिहिलं, "निदान कॅमेरासमोर तरी फुल कपडे घालून योगा करत जा मॅडम." या कमेंटकडे दुर्लक्ष न करता ऐश्वर्या नारकर यांनी त्याला थेट दिलं. त्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, "बुरसटलेले विचार सोडा. तुमचा फोकस का हलतोय?" मात्र त्यानंतरही तो युझर थांबला नाही. त्याने पुन्हा मेसेज करत म्हटलं, "याला तुम्ही बुरसटलेले विचार म्हणत असाल तर तुमच्या अकलेची कीव करावीशी वाटते. व्हिडिओला व्ह्यूज वाढवण्यासाठी असे कपडे घालून व्हिडिओ बनवता."
advertisement
या आरोपांवर ऐश्वर्या नारकर यांनी लिहिलं, "मुद्दा व्यायामाचा आहे. कोणी काय कपडे घालावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमचं स्टेटमेंट वरून अक्कल कळते आहे तुमची. व्यायाम करा, तो उपयोगी पडेल." यानंतरही त्या युझरने पुन्हा कमेंट करत लिहिलं, "कोणते कपडे घालायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात त्याचं काय करायचं?" या कमेंटवरही ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. त्यांनी उत्तर देत लिहिलं, "त्यांना व्यायाम करायला शिकवा म्हणजे विचारांचा समतोल येईल आणि डोकं शाबूत राहिल. नाहीतर तुमच्यासारखे होणार मोठे होऊन."
advertisement
ऐश्वर्या नारकर यांनी दिलेल्या या सडेतोड उत्तरामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्यांच्या या भूमिकेचं समर्थन केलं आहे. काही चाहत्यांनी तर ट्रोलर्सना योग्य उत्तर दिल्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aishwarya Narkar : व्ह्यूज वाढवण्यासाठी असे कपडे घालता! ट्रोलर्सची कमेंट, ऐश्वर्या नारकारांचा चढला पारा; अशी केली बोलती बंद
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement