advertisement

'इकडे बघ', जयराजे निंबाळकरांची राणा जगजीत सिंह पाटलांना खुन्नस, थोडक्यात राडा टळला; नेमकं काय घडलं?

Last Updated:

जयराजे निंबाळकर हे आपल्या समर्थकांसह समोरून आले. राणा पाटील यांना पाहताच जयराजेंनी मागे बघत 'इकडे बघ' असे म्हणत त्यांना थेट खुन्नस दिली.

News18
News18
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शुक्रवारी मोठा राजकीय थरार पाहायला मिळाला. उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील समोरासमोर आल्याचं पाहायला मिळाले . जयराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना जाहीरपणे डिवचल्याने परिसरात थोडा वेळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर होण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील हे जिल्हा परिषद इमारतीतून बाहेर पडत होते. त्याच वेळी जयराजे निंबाळकर हे आपल्या समर्थकांसह समोरून आले. राणा पाटील यांना पाहताच जयराजेंनी मागे बघत 'इकडे बघ' असे म्हणत त्यांना थेट खुन्नस दिली.
advertisement

मोठा राडा टळला

समोर आलेल्या व्हिडीओनुसार, जयराजे निंबाळकर समोरून आल्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे न बघता पुढे निघाले. यावेळी एकमेकांच्या बाजूने जात असताना जयराजे निंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटील यांचा खांदा एकमेकांना लागला. या प्रकारामुळे दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आमदार राणा पाटील यांनी संयम दाखवत जयराजेंच्या या कृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि ते शांतपणे पुढे निघून गेले. त्यांच्या या संयमी भूमिकेमुळे मोठा राडा होण्यापासून टळला.
advertisement

जयराजे यांना पोलीस बंदोबस्तात गर्दीतून काढले बाहेर 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे तैनात असलेल्या पोलीस प्रशासनाने तात्काळ हालचाली केल्या. जयराजे निंबाळकर आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पोलीस बंदोबस्तात तिथून सुरक्षितपणे बाहेर काढले. निंबाळकर आणि पाटील या दोन्ही घराण्यांमधील पारंपारिक राजकीय वैर या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात रंगली असून, राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'इकडे बघ', जयराजे निंबाळकरांची राणा जगजीत सिंह पाटलांना खुन्नस, थोडक्यात राडा टळला; नेमकं काय घडलं?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement