advertisement

OTT Release : थिएटरमध्ये प्रेक्षकांना रडवलं, अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? आता OTT वर, कधी आणि कुठे

Last Updated:

OTT Release : अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? या कौटुंबिक सिनेमानं थिएटरमध्ये प्रेक्षकांना रडवलं. हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

News18
News18
थिएटरमध्ये प्रेक्षकांना ज्या सिनेमानं रडवलं तो अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या कौटुंबिक चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सासू सुनेची हळवी गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. सासू सुनेच्या नात्याचा सुंदर आणि भावनिक पैलू उलगडून दाखवण्यात आला आहे.
हास्य, आपुलकी आणि भावनिकतेचा सुंदर संगम असलेली ही कथा नवविवाहित मानस्वी आणि तिची सासू स्मिता यांच्याभोवती फिरते. सुरुवातीला व्यक्तिमत्त्वातील संघर्षाने सुरू झालेला हा प्रवास हळूहळू समज, स्वीकार आणि अनपेक्षित मैत्रीत बदलतो. दैनंदिन प्रसंग, खुमासदार संवाद आणि हृदयस्पर्शी क्षणांमधून हा चित्रपट दाखवतो की सहानुभूती आणि एकत्र अनुभवांमुळे कौटुंबिक नाती कशी अधिक घट्ट होत जातात.
advertisement
निर्मिती सावंत, प्रार्थना बेहेरे, राजन भिसे आणि नकुल घाणेकर हे दमदार कलाकार सिनेमात आहेत.  दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले "ही कथा आपल्या घरातील अगदी ओळखीच्या वातावरणातून जन्माला आली आहे सासू आणि सुनेमधील खोडकर चकमकी, मतभेद आणि शेवटी निर्माण होणारी समजूत. विनोद आणि भावनांमधून आम्हाला अशा नात्याची गोष्ट सांगायची होती जी ठराविक साचे मोडून कुटुंबात महिलांची ताकद आणि भूमिका दाखवते.”
advertisement
अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या "या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात जरी विनोद आणि संघर्षाने होत असली तरी पुढे तो दोन स्त्रिया एकमेकींना समजून घेण्याचा अतिशय भावनिक आणि स्तरित प्रवास दाखवतो. स्मिताची भूमिका साकारणं खूप मजेशीर होतं कारण ती मजबूत, स्पष्टवक्ती आणि खूप खरी वाटणारी व्यक्तिरेखा आहे.”
advertisement
प्रार्थना बेहेरे सांगते "मानस्वी ही लग्नानंतर नव्या कुटुंबातील नातेसंबंध समजून घेणाऱ्या अनेक तरुण स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. हा चित्रपट दाखवतो की नाती सुरुवातीपासून परिपूर्ण नसतात, पण संयम आणि समजूतदारपणामुळे ती खूप सुंदर आणि अर्थपूर्ण बनू शकतात. आता हा प्रवास ZEE5 वर प्रेक्षकांना अनुभवता येणार याचा मला खूप आनंद आहे"
विनोद, भावना आणि आपुलकीने भरलेले कौटुंबिक क्षण यांचा सुंदर मेळ असलेला "अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई ?  हा सिनेमा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 19 मार्च रोजी ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Release : थिएटरमध्ये प्रेक्षकांना रडवलं, अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? आता OTT वर, कधी आणि कुठे
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement