advertisement

रॉयल कारभार! 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खर्चिक, पाण्यासारखा खर्च करतात पैसा

Last Updated:

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो, जो त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी आणि खर्च करण्याची पद्धत ठरवतो.

News18
News18
Numerology : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो, जो त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी आणि खर्च करण्याची पद्धत ठरवतो. काही मूलांकाच्या व्यक्तींना शिस्तबद्ध आयुष्य जगायला आवडते, तर काही मूलांक असे आहेत जे आपल्या शौकांवर आणि विलासी जीवनावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात.
मूलांक 2
2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. हे लोक स्वभावाने स्वभावाने अत्यंत भावूक आणि कल्पक असतात. त्यांना सुंदर वस्तू, सजावट आणि कलेची आवड असते. आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी ते विचार न करता पैसा खर्च करतात. त्यांच्यासाठी मानसिक समाधान पैशांपेक्षा मोठे असते.
मूलांक 4
4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. राहूच्या प्रभावामुळे या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक खर्च उद्भवतात. त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, गॅजेट्स आणि नवनवीन प्रयोग करण्याची आवड असते. अनेकदा ते केवळ इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी किंवा आपली छाप पाडण्यासाठी महागड्या वस्तूंवर मोठी रक्कम खर्च करतात.
advertisement
मूलांक 5
5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या व्यक्तींना एका जागी स्थिरावणे आवडत नाही. त्यांना प्रवासाची, नवनवीन खाद्यपदार्थांची आणि शॉपिंगची प्रचंड हौस असते. मित्रमंडळींसोबत पार्ट्या करणे किंवा फिरणे यावर ते पाण्यासारखा पैसा खर्च करतात. त्यांच्यासाठी 'आजचा दिवस' महत्त्वाचा असतो.
मूलांक 7
7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. या व्यक्तींचे छंद खूप वेगळे आणि अनेकदा महागडे असतात. त्यांना दुर्मिळ वस्तू जमा करणे किंवा आध्यात्मिक प्रवासावर खर्च करणे आवडते. ते दिखाव्यासाठी खर्च करत नाहीत, पण स्वतःच्या आनंदासाठी आणि ज्ञानासाठी मोठी गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
advertisement
मूलांक 8
8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. जरी हे लोक कष्टाळू असले, तरी त्यांना 'क्वालिटी' आवडते. ते स्वस्त वस्तू घेण्याऐवजी महागड्या आणि ब्रँडेड वस्तूंवर विश्वास ठेवतात. एकदा एखादी वस्तू आवडली की, तिची किंमत कितीही असली तरी ती मिळवण्यासाठी ते पैसा खर्च करतात. त्यांच्याकडे पैशांचे नियोजन असते, पण शौकासाठी ते मर्यादा ओलांडू शकतात.
advertisement
मूलांक 9
9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. या व्यक्ती अत्यंत दिलदार स्वभावाच्या असतात. स्वतःच्या गरजांसोबतच इतरांना मदत करण्यासाठी किंवा मित्र-परिवाराला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. मंगळाच्या प्रभावामुळे ते उत्साहात येऊन अनेकदा गरजेपेक्षा जास्त खर्च करून बसतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
रॉयल कारभार! 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खर्चिक, पाण्यासारखा खर्च करतात पैसा
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement