advertisement

पुणेकराचा देशी जुगाड, गोडतेलावरची फ्यूल चूल, 7 रुपयांत एक तास चालणार!

Last Updated:

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यातील निनाद गिडवानी यांनी या समस्येवर देशी जुगाड शोधून काढला असून त्यांनी फ्यूल चुलीची निर्मिती केली आहे.

+
गॅस

गॅस टंचाईत पुणेकराचा देशी जुगाड; खाद्य तेलावर चालणारी फ्यूल चूल 

पुणे: ‎सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी गॅसची टंचाई निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. गॅसला पर्याय म्हणून अनेकजण इंडक्शन किंवा आधुनिक चुली घेताना देखील पाहायला मिळतं आहे. पुण्यातील निनाद गिडवानी यांनी या समस्येवर देशी जुगाड शोधून काढला असून त्यांनी फ्यूल चुलीची निर्मिती केली आहे. तुम्ही खाद्य तेलाचा वापर करून या चुलीवर जेवण बनवू शकता. या चुली विषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
निनाद गिडवानी यांनी सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध प्रयोग करत आहेत. त्यांनी वैदिक फ्युएल चूल तयार केली आहे. या चुलीत वेस्ट ऑइल किंवा स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं खाद्य तेल वापरून जेवण बनवता येतं. त्यामुळे गॅस किंवा इतर इंधन उपलब्ध नसतानाही स्वयंपाक करणे शक्य होते. या चुलीत विशेष प्रकारच्या कापसाच्या वातांचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये एकूण नऊ दिवे तयार केले आहेत.
advertisement
चुलीच्या मध्यभागी असलेल्या भागात तेल टाकल्यानंतर हे दिवे पेटवले जातात. या दिव्यांमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात तापमान तयार होते आणि त्यावर सहजपणे स्वयंपाक करता येतो. गॅस टंचाई किंवा पर्यायी इंधनाचा शोध घेणाऱ्या नागरिकांसाठी ही चूल उपयुक्त ठरू शकते, असा दावा गिडवानी यांनी केला आहे. ही चूल https://www.ninadspottery.com/ या वेबसाईटवरून मागवू शकता.
advertisement
गॅसला पर्याय म्हणून ही चूल ठरू शकते उपयुक्त
ही चूल सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा आणि नारळ यांसारख्या कोणत्याही वनस्पती तेलावर चालू शकते. त्यामुळे सौरऊर्जेनंतर पर्यावरणासाठी चांगली आणि शाश्वत इंधनावर चालणारी चूल मानली जाते. या चुलीची रचना अशी आहे की घट्ट किंवा जाडसर तेलदेखील नीट जळते आणि योग्य ज्वाळा तयार होते. त्यामुळे स्वयंपाक व्यवस्थित करता येतो.
advertisement
शाश्वत इंधन वापरल्यामुळे ही चूल कार्बन न्यूट्रल असल्याचा दावा केला जातो. तसेच गॅसच्या खूप तीव्र ज्वाळेमुळे काही भाज्यांची चव, रंग आणि पोषक घटक कमी होतात. पण या चुलीत ज्वाळा नियंत्रित असल्यामुळे भाज्या नीट शिजतात. या चुलीत एका तासाला सुमारे 50 मिली तेल लागते. म्हणजे जवळपास 7 रुपयांत एक तास स्वयंपाक करता येत असल्याचं निनाद यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकराचा देशी जुगाड, गोडतेलावरची फ्यूल चूल, 7 रुपयांत एक तास चालणार!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement