आणखी एका IPL मालकाच्या निशाण्यावर होता पाकिस्तानी खेळाडू, शेवटच्या क्षणी सूत्र फिरली, लिलावात काय झालं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
द हंड्रेड या इंग्लंडमधल्या क्रिकेट लीगच्या लिलावात सनरायजर्स लीड्सने पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला टीममध्ये घेतलं, यावरून मोठा वाद झाला आहे.
मुंबई : द हंड्रेड या इंग्लंडमधल्या क्रिकेट लीगच्या लिलावात सनरायजर्स लीड्सने पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला टीममध्ये घेतलं. सनरायजर्स लीड्स ही आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादच्या मालकीची टीम आहे. अबरार अहमदसाठी सनरायजर्सने तब्बल 2.34 कोटी रुपये मोजले होते. पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये घेतल्यामुळे सनरायजर्सवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. बॉयकॉट सनरायजर्स हा हॅशटॅगही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये घेतल्यामुळे सनरायजर्सची टीम वादात सापडली असतानाच सदर्न ब्रेव्सचे हेड कोच हेमांग बदानी आणि खळबळजनक दावा केला आहे. आमच्या शॉर्टलिस्टमध्ये पाकिस्तानी खेळाडू होते, पण शेवटी आम्ही यातल्या कोणावरही बोली लावली नाही, असं हेमांग बदानी म्हणाले आहेत. सदर्न ब्रेव्हस या टीममध्ये आयपीएल मालक दिल्ली कॅपिटल्सच्या जीएमआर ग्रुपचे शेअर आहेत.
advertisement
'आमच्या लिस्टमध्ये काही खेळाडू होते, स्पर्धेमध्ये सर्वोत्तम टीम बनवावी, यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं. आमच्याकडे आधीपासूनच ट्रिस्टन स्टब्स आणि मार्कस स्टॉयनिस होते, त्यामुळे आम्ही परदेशी स्पिनर किंवा स्थानिक स्पिनरला टीममध्ये घेण्याबाबत विचार करत होतो, त्यामुळे आम्ही आदिल रशीदला टीममध्ये घेतलं', अशी प्रतिक्रिया हेमांग बदानीने दिली.
'आम्ही निखील चौधरीला ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये घेतलं. उपलब्ध असलेल्या सगळ्यात चांगल्या खेळाडूंची निवड करण्याचा आमचा प्रयत्न होता. लिलावादरम्यान अनुशासन आणि धैर्य ठेवणं गरजेचं आहे. लिलाव तुमच्या मनासारखा झाला नाही, तरीही तुम्हाला धैर्य ठेवावं लागतं आणि परिस्थितीनुसार बदलावं लागतं', अशी वक्तव्य हेमांग बदानी यांनी केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 6:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आणखी एका IPL मालकाच्या निशाण्यावर होता पाकिस्तानी खेळाडू, शेवटच्या क्षणी सूत्र फिरली, लिलावात काय झालं?










