रेल्वे ट्रॅकवर आली व्यक्ती, लोको पायलटने अचानक ट्रेन थांबवली, पण पुढे जे घडलं जे आयुष्यात कधी पाहिलं नसेल

Last Updated:

Loco pilot beat man on rail track : रेल्वे ट्रॅकवरून उठल्यानंतर ही व्यक्ती समोर थांबलेल्या गाड्यांकडे पाहून बोलताना दिसते. इतक्यात तिथं ट्रेन येते. ती ट्रेन तिथं थांबते. ट्रेनचा लोकोपायलट बाहेर येतो.

News18
News18
नवी दिल्ली :  सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर व्हिडीओ बनवणाऱ्यांची कमी नाही. असे किती तरी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. रिल्सच्या नादात लोक रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर येत आपला जीव धोक्यात घालतात. अशीच एक व्यक्ती जी रेल्वे ट्रॅकवर आली. त्यावेळी ट्रेनच्या लोकोपायलटने अचानक ब्रेक लावून ट्रेन थांबवली. पण त्यानंतर जे घडलं ते आयुष्यात तुम्ही कधी पाहिलं नसेल.
लोको पायलटचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला समोर काही गाड्या थांबलेल्या दिसतात. तर खाली जमिनीवर जिथं रेल्वे ट्रॅक आहे तिथं एक व्यक्ती झोपलेली दिसते. दुसरी व्यक्ती तिला तिथून उठवते. गाड्यांसाठी हा रेल्वे क्रॉसिंगचा मार्ग आहे. जिथं ट्रेन यायची असते तेव्हा फाटक बंद केलं जातं आणि रूळ ओलांडून पलिकडे जाणाऱ्या गाड्या, माणसं थांबतात. फाटक बंद असताना ही व्यक्ती मात्र रूळांवर जाऊन बसली. समोरून ट्रेन येत होती. सुदैवाने त्याआधी दुसऱ्या व्यक्तीने तिला ट्रॅकवरून उठवलं. पण त्यानंतर जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
advertisement
रेल्वे ट्रॅकवरून उठल्यानंतर ही व्यक्ती समोर थांबलेल्या गाड्यांकडे पाहून बोलताना दिसते. इतक्यात तिथं ट्रेन येते. ती ट्रेन तिथं थांबते. ट्रेनचा लोकोपायलट बाहेर येतो. त्याच्या हातात काहीतरी आहे. तो रेल्वे ट्रॅकजवळ गोंधळ घालणाऱ्या त्या व्यक्तीकडे जातो. एका हातात त्याला पकडतो आणि दुसऱ्या हातातील वस्तून त्याच्या पार्श्वभागावर मारतो. त्यानंतर ट्रॅकवर ढकलून देतो.
advertisement
दररोज ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेतील भांडणं काही नवीन नाहीत. धक्का लागला म्हणून किंवा सीटवरून भांडणं होत असतात. रेल्वेत भांडणाऱ्या प्रवाशांचे व्हिडीओही सोशल मीडियावर ट्रेनमधील भांडणं तुमच्यासाठी नवीन नसतील. ट्रेनमध्ये भांडणाचे कितीतरी व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.
advertisement
रेल्वे ट्रॅकवर गोंधळ घालणारी ही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जातं आहे. त्याला लोकपायलटने चांगलाच धडा शिकवला. त्याच्या या कृत्यामुळे केवळ त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही तर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झाला असता. लोको पायलटला ट्रॅकवर कोणीतरी उभं असल्याचं लक्षात येताच त्याने ताबडतोब आपत्कालीन ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली. ट्रेनमधून बाहेर येत त्या व्यक्तीला अद्दल घडवली.
advertisement
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @adv_soyyab या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. काही जण म्हणतात की लोको पायलटने योग्य काम केले, कारण अशा बेजबाबदार लोकांना धडा शिकवणं महत्त्वाचं आहे. एका युझरने लिहिलं की तो लोको पायलट नाही, तो खऱ्या आयुष्यातील हिरो आहे, तर एकाने अशा मद्यपींना धडा शिकवला पाहिजे, असं म्हटलं आहे. काहींनी हा व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर एकाने सरकारी कर्मचाऱ्याचा राग पाहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या/Viral/
रेल्वे ट्रॅकवर आली व्यक्ती, लोको पायलटने अचानक ट्रेन थांबवली, पण पुढे जे घडलं जे आयुष्यात कधी पाहिलं नसेल
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement